कुडाळकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

कुडाळ पोलिसांचे पथक ठाणे-मुंबईकडे रवाना

*🛑कुडाळ पोलिसांचे पथक ठाणे-मुंबईकडे रवाना*

 

*🛑हिर्लोक येथील अघोरी पूजा प्रकरण*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज: कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कुडाळ, दि- २१:-* हिर्लोक आंबेडकरवाडी येथील जादूटोणा व अघोरी पूजाप्रकरणी कुडाळ पोलीस पथकाच्या हाती चिपळूण येथे काही लागले नसल्याने पथक आता ठाणे-मुंबई येथे रवाना झाले आहे. ठाणे येथील विशाल जाधव याच्या घराची तसेच अन्य साथीदारांच्या घरांची झडती व अन्य काही माहिती मिळते का?, याचा शोध कुडाळ पोलीस घेणार आहेत. दरम्यान, त्या पाचही संशयितांची पोलीस कोठडी शनिवारी संपणार असून पुढील तपासासाठी पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी पोलीस न्यायालयात करणार आहेत, अशी माहिती कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली. हिर्लोक येथील या प्रकरणात आता पोलीस वेगवेगळ्या मार्गांनी माहिती मिळवून तपास करीत आहेत. या अंतर्गत प्राथमिक टप्यात पोलिसांचे पथक चिपळूण येथे गुरुवारी रवाना झाले होते. यातील ‘भगत’ असलेल्या सुमित गमरे याच्या चिपळूण येथील घराची झडती पोलिसांनी घेतली मात्र, तिथे पोलिसांना विशेष काही सापडले नव्हते. आता यानंतर पोलिसांनी आपली तपासाची चक्रे मुंबईच्या दिशेने फिरविली आहेत.

यातील मुख्य सूत्रधार व हिर्लोक येथे ज्याच्या घरात खड्डा खोदला व पूजा मांडली होती, त्या विशाल जाधव याचा ठाणे-मुंबई येथे फ्लॅट आहे. तेथील घराची झडती पोलीस घेणार आहेत. परंतु यामध्ये मिळालेल्या माहितीशिवाय अजून तसे विशेष काही हाती लागलेले नाही.

दरम्यान, या प्रकरणातील विशाल विजय जाधव, सुमित मिलिंद गमरे, हर्षाली विशाल जाधव, अविनाश मुकुंद संते व दिनेश बालाराम पाटील या पाच संशयितांची पोलीस कोठडी शनिवारी संपणार आहे. मात्र, कुडाळ पोलिसांना या प्रकरणी अजून मुळात जाऊन तपास करायचा आहे. त्यामुळे संशयितांची पोलीस कोठडी संपताच ती पुन्हा वाढवून देण्याची मागणी न्यायालयाकडे करणार, अशी माहिती पोलिसांनी दिली.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!