हेवाळेत टस्कराच्या आगमनाने दहशत
*🛑हेवाळेत टस्कराच्या आगमनाने दहशत*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴दोडामार्ग, दि- २०:-* हेवाळे येथे खराडी-बांबर्डेमध्ये गुरुवारी सकाळच्या सुमारास टस्कर हत्ती आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदर हत्ती हा एकटाच आहे की सोबत मादी आहे, याबाबत अद्याप निश्चित माहिती मिळाली नसली तरी परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीती पसरली आहे. दोडामार्ग-वीजघर मार्गावरील हेवाळे येथे राममंदिरानजीक असलेल्या नदीपात्रालगत गुरुवारी सकाळी सुळे असलेल्या टस्कर पाहायला मिळाला. हा हत्ती जोरजोराने चित्कार करीत होता. मुख्य रस्त्यालगत हत्ती आल्याचे कळताच बघ्यांची गर्दी जमू लागली. त्यातीलच काहींनी व्हीडिओ शूटिंगही केले. बऱ्याच दिवसांनंतर तिलारी खोऱ्यात हत्तीचे दर्शन झाल्याने ग्रामस्थ भयभित झाले आहेत. या हत्तीच्या संचाराबाबत दोडामार्ग वन विभागानेही दुजोरा दिला आहे.

