भात हमीभावासाठी ई पीक नोंदणी महत्वाची !
*🛑भात हमीभावासाठी ई पीक नोंदणी महत्वाची !*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज:कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- १९:-* शेतकऱ्यांनी ई पीक नोंदणी केली तरच शासकीय योजनांचा फायदा घेता येईल. भात हमीभावाने खरेदी करताना ई पीक नोंदणी महत्वाची आहे. दलालांच्या तावडीतून शेतकऱ्यांची सुटका शासनाने केली आहे. त्याचा फायदा घ्यावा, असे आवाहन सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गांवडे यांनी केले.
शासकीय आधारभूत किंमत भातखरेदी योजना २०२४-२५ अंतर्गत भात खरेदी शुभारंभाचा कार्यक्रम सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाचे चेअरमन प्रमोद गावडे व व्हाईस चेअरमन रघुनाथ रेडकर यांच्या हस्ते संस्थेच्या सर्व संचालकांच्या उपस्थितीत मळगाव येथे करण्यात आला. सदर भात खरेदीसाठी शासनाने प्रतिक्विंटल २३०० रुपये एवढा दर जाहीर केला आहे. भात खरेदी ऑ नलाईन असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे रजिस्टेशन ३१ डिसेंबर २०२४ पूर्वी होणार आहे, अशाच शेतकऱ्यांनी केंद्रावर भात विक्रीस आणायचे आहे. भात खरेदीची अंतिम तारीख ३१ जानेवारी आहे. सावंतवाडी, मळगाव, मळेवाड, तळवडे, कोलगाव, मडुरा, डेगवे, इन्सुली व भेडशी येथे भात खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन चेअरमन गावडे यांनी केले आहे.
यावेळी प्रमोद गावडे व संचालक गुरुनाथ पेडणेकर यांनी शासकीय योजनेबाबत मार्गदर्शन केले. भात खरेदी शुभारंभप्रसंगी संस्थेचे संचालक अभिमन्यू लोंढे, विनायक राऊळ, आत्माराम गावडे, ज्ञानेश परब, दत्ताराम कोळमेकर, प्रमोद सावंत, नारायण हिराप, शशिकांत गावडे, दत्ताराम हरमलकर, प्रवीण देसाई, संस्थेचे व्यवस्थापक महेश परब, ग्रा. पं. सदस्य सावळ, संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी नाईक, अनिल मयेकर, नंदा सावळ, एकनाथ लातये, जनार्दन सावळ, कृष्णा राऊळ, तुकाराम कोरगावकर, रघुनाथ नाईक, सुभाष कुडव, औदुंबर सावंत, धर्माजी गावडे, प्रमिला राऊळ, मंजिरी सावंत उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

