कोकणमहाराष्ट्रशासकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

विभागीय आयुक्त कार्यालयाकडून “माझी वसुंधरा अभियान” अंतर्गत सावंतवाडी नगरपरिषदेस भेट

*🛑विभागीय आयुक्त कार्यालयाकडून “माझी वसुंधरा अभियान” अंतर्गत सावंतवाडी नगरपरिषदेस भेट*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज:कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- १९:-* सावंतवाड़ी नगरपरिषदेने माझी वसुंधरा अभियान १.२.३ मध्ये कोकण विभागात सातत्याने प्रथम क्रमांकाचे मानांकन प्राप्त केलेले आहे, त्या अनुषंगाने नगरपरिषदेने माझी वसुंधरा अंतर्गत राबविलेले विविध उपक्रम यांची माहिती जाणून घेण्यासाठी तसेच श्री. मंदार पाटील (विभागीय तांत्रिक तज) नगरपरिषद प्रशासन शाखा, विभागीय आयुक्त कार्यालय, कोकण विभाग यांच्याकडून दिनांक ११/१२/२०२४ रोजी प्रत्यक्ष भेट दिली. नगरपरिषदेने माझी वसुंधरा अत्तर्गत केलेल्या विविध उपक्रमांची पाहणी केली. यावेळी सावंतवाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. सागर साळुंखे व प्रशासकीय अधिकारी श्री. वैभवकुमार अधारे यांच्यासमवेत नगरपरिषदेने राबविलेल्या विविध उपक्रमाचे पाहणी करून कौतुक केले व सावंतवाड़ी नगरपरिषदेचे माझी वसुंधरा अंतर्गत असलेले काम हे राज्यस्तरावर मानांकन प्राप्त करण्याजोगे आहे. सावंतवाडी नगरपरिषदेस राज्यस्तरावर उच्चस्तर क्रमांक प्राप्त करण्यासाठी आवश्यक त्या सूचना त्यांच्यामार्फत देण्यात आल्या. माझी वसुंधरा अभियान अंतर्गत दिशादर्शक फलक बनविणे, ज्येष्ठ नागरिकांना माझी वसुंधरा अभियानाची माहिती देणे, शहरामध्ये बाबू व शेवगा लागवड करणे, सौरऊर्जेच्या वापरास प्रोत्साहन देणे, शहरातील पेट्रोल पंप व्यावसायिक यांना चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी प्रोत्साहित करणे, शहरात होणाऱ्या विविध सास्कृतिक कार्यक्रमांमध्ये माझी वसुंधरा अभियानाची प्रचार प्रसिद्धी करणे व हरित शपथ घेणे, शहरकरिता अभियानाअंतर्गत CSR फड उपलब्ध करूत घेणे अशा विविध मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या.

विभागीय तंत्रज्ञ यांच्या प्राप्त मार्गदर्शक सूचनेनुसार सावंतवाडी नगरपरिषदेने माझी वसुंधरा अभियान व NULM अंतर्गत दिनांक १७/१२/२०२४ रोजी सावंतवाडी शहरातील सर्व महिला बचत गटांना माझी वसुंधरा अभियानाची माहिती दिली व हरित शपथ देण्यात आली. तसेच माझी वसुंधरा अभियान अंतर्गत व स्वच्छ महाराष्ट्र (नागरी) अभियान, कुशाय इनोवेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी नगरपरिषद स्वच्छता कर्मचारी यांच्या आरोग्यविषयक व वसुंधरेच्या कार्यशाळेचे आयोजन दिनांक १८/१२/२०२४ रोजी नगरपरिषदेच्या काझी शहाबु‌द्दिन हॉल येथे करण्यात आले होते. आपल्या शहराची स्वच्छता करणेसोबत आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे, PPE किट या वापर तसेच माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पर्यावरणातील संरक्षण करण्यासाठी भूमी, वायु, जल, अग्नि व आकाश या पाच पंचतत्वांचे संवर्धन करण्याचे दृष्टीने मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सावंतवाडी नगरपरिषद आरोग्य विभाग प्रमुख श्री. धनंजय देसाई, स्वच्छता निरीक्षक श्री. पांडुरंग नाटेकर, श्री. दीपक म्हापसेकर उदयान पर्यवेक्षक श्री. गजानन परब आदी उपस्थित होते. या कार्यशाळेमध्ये सुमारे ८० स्वच्छता मित्रांनी सहभाग घेतला होता. यावेळी माझी वसुंधरा ५.० अंतर्गत हरिथ शपथ नगरपरिषदेमार्फत घेण्यात आली.

कुशाय इनोवेशन फाउंडेशन च्या श्री ललित पेडणेकर यांच्या मार्फत स्वच्छता कर्मचाऱ्यामध्ये स्वच्छतेविषयक व माझी वसुंधरा विषयक प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. हयामध्ये सफाई कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. स्पर्धेमध्ये विजेत्या झालेल्या सफाई कर्मचारी यांना बक्षीस देऊन व पर्यावरण दूत प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

 

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

 

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

 

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*

🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत

🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक

💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या

❄️ वातानुकूलित वर्गखोल्या

🚌 बस आणि वसतिगृहाची सोय

💻 संगणकीय प्रयोगशाळा

📙 ग्रंथालयाची सुविधा

🧪 सुसज्ज प्रयोगशाळा

⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद

🗒️ यशस्वी निकालाची परंपरा

▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग

⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन

🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा

🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश

👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

 

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

 

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

 

☎️ संपर्क :

9158788345

8788101853

9405238763

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!