आणखीकोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

🛑 माझ्या खांद्यावर टाकलेली जबाबदारी शंभर टक्के यशस्वीपणे पार पाडणार ; मंत्री नितेश राणे

🛑 माझ्या पदाचा जनतेच्या हितासाठी प्रामाणिक उपयोग करणार

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴नागपूर,दि-१७:- देशाच्या नेतृत्वाने आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी व सर्व वरिष्ठ मंडळींनी आमच्या सारख्या हिंदू तरूणांवर मोठी जबाबदारी टाकली आहे. महाराष्ट्र कोकण तसेच हिंदू समाज या सगळ्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी, संरक्षण करण्यासाठी मी जास्तीत जास्त माझ्या पदाच्या मध्यमनातून प्रयत्न करेन. माझ्या खांद्यावर टाकलेली जबाबदारी मी शंभर टक्के प्रामाणिक पद्धतीने पार पाडणार. त्या दृष्टिकोनातून माझी पाऊले टाकली जातील, असा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
महाराष्ट्रात हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस असून सर्वच मंत्रिमंडळ नागपूर येथे दाखल झाले आहेत. यावेळी पत्रकारांनी मंत्री नितेश राणे यांच्यावशी संवाद साधला. यावेळी बोलताना नितेश राणे यांनी संजय राऊत तसेच विरोधकांवर खोचक टीका केली आहे. तसेच माझ्या पदाचा लोकांच्या हितासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे देखील त्यांनी आश्वासन दिले आहे.
विरोधकांनी ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन करत असून यावर प्रश्न विचारला असता त्यावर नितेश राणे म्हणाले, हेच आंदोलन जर लोकसभेच्या नंतर केले असते तर लोकांना त्याच्यावर विश्वास पण बसला असता. वायनाडच्या कुठल्यातरी पायऱ्या शोधल्या आणि तिथे बसले आणि तिथे ईव्हीएम बद्दल बोंबलले तर लोकांनी विश्वास ठेवला असता. आता लोकांनाही माहीत आहे की हे हिंदूद्वेषाचे राजकारण आहे. जेव्हा व्होट जिहाद झाला तेव्हा या लोकांना काहीच वाटले नाही. तेव्हा हिरवा गुलाल उडवला. आता हिंदू समाजाने एकत्रित येऊन, हिंदुत्व विचाराचे सरकार निवडले, हिंदू म्हणून मतदार म्हणून आपली ताकद दाखवली, तेव्हा या लोकांना मिरच्या लागत आहेत. हिरव्या मिरच्या लागत आहेत. म्हणून ईव्हीएमच्या आंदोलनाला काही अर्थ नाही, असे नितेश राणे म्हणाले.
संजय राऊत यांच्याकडून काही शुभेच्छा आल्या आहेत का, असा प्रश्न नितेश राणे यांना विचारण्यात आला तेव्हा राणे म्हणाले, महाराष्ट्रात तसेच सगळीकडूनच शुभेच्छा मिळत आहेत. संजय राऊत यांचे तेवढे मोठे मन नाही. त्याचे नाही आणि त्याच्या मालकाचे देखील एवढे मोठे मन नसल्याची खोचक टीका राणे यांनी यावेळी राऊत तसेच उद्धव ठाकरे यांच्यावरही केली आहे. अशा लोकांकडून आम्हाला शुभेच्छा नकोच आहेत, केवळ त्यांनी महाराष्ट्रात नीट वागावे, व्यवस्थित तोंड उघडावे, असा सल्ला नितेश राणे यांनी यावेळी बोलताना दिला आहे.

*……….सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇*

 

*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*🎥KOKAN LIVE BREAKING || ADVT*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*👇🏻जाहिरात लिंक👇🏻*

ADVT || सिंधुदुर्ग ॲकॅडमी


________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!