वाफोली येथील शाळा नं.१ शतक महोत्सव २०२४/२५ अंतर्गत आयोजित खुली एकल गायन व फुगडी स्पर्धेचा निकाल जाहीर.
*🛑वाफोली येथील शाळा नं.१ शतक महोत्सव २०२४/२५ अंतर्गत आयोजित खुली एकल गायन व फुगडी स्पर्धेचा निकाल जाहीर.*
*🛑गायन व फुगडी स्पर्धेत स्पर्धकांचा उत्सफूर्त प्रतिसाद*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :शैलेश गवस*
*🎴बांदा, दि- ०९:-* वाफोली येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नं.१ च्या शतक महोत्सव २०२४/२५ अंतर्गत खुली एकल गायन व फुगडी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.प्रथमतः उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व श्री देवी सरस्वती मातेचे पूजन करून आयोजित कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.या शुभप्रसंगी जागतिक दर्जाचे चित्रकार (उद्घाटक) श्री पोलाजी सर,प्रमुख अतिथी म्हणून माजी केंद्र प्रमुख (बांदा) श्री संदीप गवस,उप सरपंच श्री ग्रा.वाफोली वीनेश गवस,शिक्षण प्रसारक मंडळ बांदा श्री डी.बी.वारंग,वि.का.स.सेवा सोसा.चेअरमन सौ.धनश्री गवस,व्हा.चेअरमन अनिल गवस,देवस्थान प्रमुख माऊली पंचायतन श्री हरी रामा गवस, म.गां.तंटामुक्त गाव समिती वाफोली श्री सतीश गवस,पोलीस पाटील श्री आना गवस,शिक्षक,आजी माजी विद्यार्थी, उपस्थित होते.ही स्पर्धा खुली एकल गायन व गाव मर्यादित फुगडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.लहान गट कू. सर्वज्ञ वराडकर बांदा याने प्रथम क्रमांक पटकावला तर चिन्मय निलेश मेस्त्री,मैथिली मालवणकर यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला.या गटात हर्षिता गवस व कविराज गवस यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला.मोठ्या गटात पारस गवस यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर केतकी सावंत व आत्माराम कवठणकर यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला.भावना परब, कौस्तुभ धुरी हे उत्तेजनार्थ क्रमांकाचे मानकरी ठरले.
खुली एकल गायन स्पर्धेचे परीक्षण श्री अर्जुन नाईक (पेडणे.गोवा)श्री अंकुश सांगेलकर (सांगेली)यांनी केले तर संगीत साथ श्री नीरज भोसले (तबला),श्री मंगेश मेस्त्री(हार्मोनियम)कु.केतकी सावंत (मंजिरी)यांनी दिली.गाव मर्यादित महिला फुगडी स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे नारीशक्ती महिला फुगडी संघ (आदर्श नगर) प्रथम क्रमांक पटकावला.शिवकन्या पारंपरिक फुगडी संघ वाफोली,महापुरुष महिला फुगडी संघ आडावाडी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला आहे.सप्तशृंगी महिला फुगडी टेंबवाडी व मंगळागौरी महिला फुगडी संघ वझरिवाडी हे संघ उत्तेजनार्थ क्रमांकाचे मानकरी ठरले आहे.आपापल्या परीने प्रत्येक फुगडी संघाच्या वतीने समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला होता.सर्व विजेत्यांना रोख पारितोषिक व. प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.यावेळी मान्यवरांचे शतक महोत्सव समिती उपाध्यक्ष श्री विलास गणपत गवस यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मनोहर लक्ष्मण गवस यांनी केले तर आभार श्री विलास गणपत गवस यांनी मानले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

