कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

जिमखाना मैदान खेळपट्टी आठवड्यात सुस्थितीत करणार

*🛑जिमखाना मैदान खेळपट्टी आठवड्यात सुस्थितीत करणार*

 

*🛑मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्याशी चर्चा करताना जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे शिष्टमंडळ.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज: कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०५:-* येत्या पंधरा ते वीस दिवसात सावंतवाडी जिमखाना मैदानाच्या खेळपट्टीसह सपाटीकरण करून मैदान उपलब्ध करून देण्याची ग्वाही मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिली. या शिष्टमंडळाचे नेतृत्व माजी आरोग्य सभापती अॅड. परिमल नाईक यांनी केले. सावंतवाडी जिमखाना मैदानावरील खेळपट्टीच्या दुरवस्थेबाबत अॅड परिमल नाईक यांनी आवाज उठविला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळने या खेळपट्टीसंदर्भात मुख्याधिकारी साळुंखे यांची भेट घेऊन लक्ष वेधले. यावेळी यापूर्वी मैदानाच्या दुरवस्थेबाबत आवाज उठवून क्रीडा प्रेमींच्यावतीने मोर्चा काढण्याचा इशारा अॅड. नाईक यांनी दिला होता. तर बुधवारी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात मैदानविषयक भेडसावणाऱ्या विविध मुद्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. येत्या पंधरा ते वीस दिवसात सर्व अडथळे दूर करून प्राधान्याने खेळपट्टीसह मैदान खेळण्यासाठी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही मुख्याधिकाऱ्यांनी दिली. यावेळी अॅड. नाईक यांच्यासह जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी बाळ चोडणकर, राजन नाईक, बाबल्या दुभाषी व क्रीडाप्रेमी उपस्थित होते.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

 

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

 

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

 

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*

🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत

🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक

💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या

❄️ वातानुकूलित वर्गखोल्या

🚌 बस आणि वसतिगृहाची सोय

💻 संगणकीय प्रयोगशाळा

📙 ग्रंथालयाची सुविधा

🧪 सुसज्ज प्रयोगशाळा

⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद

🗒️ यशस्वी निकालाची परंपरा

▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग

⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन

🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा

🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश

👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

 

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

 

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

 

☎️ संपर्क :

9158788345

8788101853

9405238763

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!