आणखीकोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 आंबोली, चौकुळ, इसापूर, तेरवण मार्गे बेळगांव चंदगड बस फेऱ्या सुरू करा..

🛑 सामाजिक कार्यकर्ते दत्ताराम गावकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली विभागीय नियंत्रकांकडे मागणी*

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-०२:– सावंतवाडी, दोडामार्ग, आणि चंदगड अशा तिन्ही तालुक्यातील अति दुर्गम भागत आंबोली,चौकुळ, इसापूर, तेरवण अशी गावे आहेत. सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यातील गावांना, शाळेतील, कॉलेज मुलांना येण्याची व जाण्याची सोय उपलब्ध नाही. आणि पर्याय सुद्धा नाही आहे.
सद्यस्तिथीत सावंतवाडी आगाराची बस आंबोली चौकुळ कुंभवडे बारमाही चालू आहे. तसेच चंदगड आगाराची बस सद्यस्थितीत चंदगड ते पारगड अशी बससेवा बारमाही चालू आहे.तेरवण मधील ग्रामस्थांना तहसीलदार दोडामार्ग, किंवा अन्य कामानिमित्त या ठिकाणी येण्याची व जाण्याची सोय नाही आहे.त्यामुळे अनेकांना दोन दोन दिवस एखाद काम किंवा अन्य कारणास्तव आल्यावर जाण्याची सोय नसल्यामुळे त्यांना डोंगर उतरून खाली मेढे किंवा तिराळीत चालत यावे लागते. त्यामुळे सगळा डोंगराळ भाग असून पायवाट असल्यामुळे आणि जंगली जनावर यांची भीती असते. पण नाविलाजास्तव यावं लागत.तसेंच ह्या नागरिकांना आरोग्य ( हॉस्पिटल साठी )सावंतवाडी, सिंधुदुर्ग सोय नसल्यामुळे चंदगड, कोल्हापूर, बेळगाव ह्या महागड्या हॉस्पिटल मध्ये जावे लागते.म्हणून दोडामार्ग, सावंतवाडी व्हाया आंबोली ,चौकुळ इसापूर,तेरवण मोटणवाडी मार्गे चंदगड अशी एक बस फेरी सुरु करण्यात यावी. अशी मागणी हाडाळी येथील सामाजिक कार्यकर्ते दत्ताराम गावकर यांनी विभागीय नियंत्रक, महाराष्ट्र परिवहन महामंडळ ,कणकवली यांच्या कडे लेखी नेवेदना द्वारे केली आहे.
तसेच ते निवेदनात फुडे म्हणाले की , ह्या गाडीची वेळ ही सकाळी 6 वाजता सुटणारी असावी व दुपारी 1:30 वाजता दोडामार्ग वरून सुटणारी अशी निश्चित करून बस उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
तसेंच आंबोली व्हाया ,चौकूळ,इसापूर ,तेरवण मार्गांवर वैभववाडी ते बेळगाव, मोटनवाडी , पाटणे फाटा, मार्गे बेळगाव अशी बससेवा सुरु करण्यात यावी.ह्या बस मुळे सिंधुदुर्ग जिल्हा तसेच जिल्हा आरोग्य केंद्र आणि सावंतवाडी तालुक्यातील इतर शासकीय कार्यालय, असून नागरिकांना जिल्हा कार्यालय गाठण्यासाठी दोन दिवस लागत आहेत.त्यामुळे आपण ह्या रास्त मागण्या विचारात घेऊन लवकरत लवकर बस फेऱ्या चालू कराव्यात.
ही बस बेळगाव वरून सकाळी सुटून वैभववाडी जाईल आणि. दुपारी 3 वाजता वैभववाडी वरून सुटून बेळगाव जाईल. अशीच असावी.
तरी आपण ह्याचा रास्त मागणीचा योग्य विचार विनिमय करून त्वरित बस उपलब्ध करून देण्यात यावी.सध्या चालू असलेली देवगड बेळगाव किंवा मालवण बेळगाव ह्या वळवता येत असतील तर वळवण्याचा विचार व्हावा. न पेक्षा नवीन गाडी बारमाही बससेवा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
यावेळी दत्ताराम गांवकर,निखिल राऊळ ,सुदेश कडव,सत्यवान भोसले,तुकाराम गवस आदी उपस्थित होते.

*……….सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇*

 

*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*🎥KOKAN LIVE BREAKING || ADVT*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*👇🏻जाहिरात लिंक👇🏻*

ADVT || सिंधुदुर्ग ॲकॅडमी


________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!