🛑 शिवरायांचे चरित्र हा एक अभ्यासाचा भाग असला पाहिजे, जेणेकरून आदर्श नवीन युवापिढी घेडेल ; डॉ. संजीव लिंगवत
🛑 मठ नं १ येथे गडकिल्ले व संवर्धन विषयक मार्गदर्शन
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-२९:– छत्रपती शिवाजी महाराजांनी एका महान साम्राज्याचा पाया घातला ज्याने आधुनिक भारतीय इतिहासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली . त्याने कोकण किनारपट्टीवर मजबूत सैन्य आणि नौदल स्थापन केले. छत्रपती शिवाजी महाराज हे गनिमी काव्याचेही मास्टर मानले जात होते, आरमार,अर्थशास्त्र या बाबतीत अव्वल असलेले शिवराय यांचे संपूर्ण चरित्र हा एक अभ्यासाचा भाग असला पाहिजे, जेणेकरून आदर्श नवीन युवापिढी घडु शकेल असे विचार महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक व पर्यटन मंत्रालय महावारसा समिती सिंधुदुर्ग चे सदस्य डॉ. संजीव लिंगवत यांनी आज कै. रायसाहेब डॉ रामजी धोंडजी खानोलकर केंद्रशाळा मठ नं १ येथे बोलताना सांगितले. जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष असलेले डॉ. संजीव लिंगवत व इतिहास अभ्यासक हॅनी मॅनसिंग यांनी “गडकिल्ले व संवर्धन ” याविषयी शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
डॉ. संजीव लिंगवत हे जनसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत असुन दुर्गसंवर्धन, अवयव दान, अंधश्रद्धा निर्मूलन, ग्राहक साक्षरता, नशाबंदी , व्यसन निर्मुलन , लैंगिक शिक्षण, पर्यावरण व पर्यटन या विषयावर ते महाराष्ट्र राज्यात क्रियाशील कार्य करत आहेत. त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना काही संस्था यांनी गौरविण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेवर व्यसन या विषयावर त्यांनी महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केलं आहे.
तसेच हॅनी मॅनसिंग या आंतरराष्ट्रीय स्तरावरिल पोर्तुगीज, रशियन, फ्रेंच आदी सोळा भाषांमध्ये इंग्रजी भाषेतील पुस्तके रुपांतरीत करतात, म्हणजे त्या लॅग्वेज ट्रान्सलेटर असुन इतिहास व पर्यावरण या विषयावरील त्या अभ्यासक आहेत. मुळ हाॅलंड, नेदरलँड्स येथील नागरिक असलेल्या हॅनी यांनी वेंगुर्ले कोट उर्फ डच वखार च्या सध्या चालू असलेल्या संवर्धन कामात या ऐतिहासिक वास्तूचा मुळ आराखडा उपलब्ध करून देऊन पुरातत्व विभागाला पण सहकार्य केले आहे.
दोन्ही मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून गडकिल्ले याबाबत मार्गदर्शन केले तसेच वेंगुर्ले येथील डच वखार बाबत माहिती दिली. त्याचबरोबर ‘गडसंवर्धन काळाची गरज का ‘ आहे याचे महत्व विषद केले. यावेळी दुर्ग संवर्धन कार्याबद्दल अखिल गिर्यारोहण समितीच्या वतीने सिंधुदुर्ग गिर्यारोहण समितीचे उपाध्यक्ष व इतिहास अभ्यासक डॉ. संजीव लिंगवत व हॅनी मॅनसिंग यांच्या हस्ते प्रशालेचे उच्चश्रेणी पदवीधर शिक्षक व मावळा दुर्ग प्रतिष्ठानचे गणेश नाईक यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक अजित तांबे, पांडुरंग चिंदरकर, प्रतिमा साटेलकर, पदवीधर शिक्षक गणेश नाईक, सामाजिक कार्यकर्ते किशोर पोतदार उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक अजित तांबे यांनी तर दोन्ही मार्गदर्शकांचे आभार प्रदर्शन शाळेच्या वतीने गणेश नाईक यांनी केले.
*……….सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇*
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*🎥KOKAN LIVE BREAKING || ADVT*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*👇🏻जाहिरात लिंक👇🏻*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

