राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा १ डिसेंबर रोजी
*🛑राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा १ डिसेंबर रोजी*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्गनगरी, दि- २९:-* महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी ‘महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४’ रविवार १ डिसेंबर २०२४ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ तालुक्यातील संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ आणि कुडाळ हायस्कूल, कुडाळ ज्युनियर कॉलेज या दोन उपकेंद्रावर घेण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी नितीन राऊत यांनी दिली आहे. ही परीक्षा सकाळी १० ते दुपारी १२ व ३ ते सायंकाळी ५ या दोन सत्रात घेण्यात येणार आहे. एकूण ५८३ उमेदवार या परीक्षेसाठी बसणार आहेत. आणि संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ (KD००१००१ ते KD ००११९२), कुडाळ हायस्कूल, कुडाळ ज्युनियर कॉलेज (KD ००२००१ ते KD००२३९१) अशी परीक्षेची बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे.
या परीक्षेच्या आयोजनाबाबत उमेदवारांना महत्वाच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये उमेदवारांनी परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास अगोदर उपस्थित राहवे. येताना सुधारित प्रवेशप्रमाणपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट, निवडणूक आयोग ओळखपत्र, स्मार्ट कार्ड व ड्रायव्हींग लायन्सन यापैकी एक व त्याची सुस्पष्ट छायांकित प्रत प्रत्येक पेपरच्यावेळी स्वतंत्र सादर करावी. आयोगामार्फत आयोजित परीक्षामध्ये कॉपीचा, गैरप्रकाराचा प्रयत्न करणाऱ्या घटनांची आयोगाकडून गंभीर दखल घेण्यात येणार असून आयोगाकडून संबंधितांवर फौजदारी व प्रशासकीय अशा दोन्ही स्वरुपाची कारवाई करण्यात येणार आहे. परीक्षांकरिता आयोगाने कडक उपाययोजना केलेल्या आहेत. परीक्षा उपकेंद्रांवर उमेदवारांची आयोगाकडून नियुक्त करण्यात आलेल्या सेवा पुरवठादार संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून तपासणी (Frisking) करण्यात येणार आहे. पर्यवेक्षणासाठी विशेष निरीक्षक, भरारी पथकाची नियुक्ती केली आहे. जिल्हाधिकारी स्वतः पर्यवेक्षणावर लक्ष ठेवणार आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

