कुडाळकोकणमहाराष्ट्र

शिवापूर बीएसएनएल मोबाईल टॉवरची रेंज सुरळीत करा,अन्यथा जनतेचा उद्रेक होईल

*🛑शिवापूर बीएसएनएल मोबाईल टॉवरची रेंज सुरळीत करा,अन्यथा जनतेचा उद्रेक होईल*

*🛑माजी सभापती मोहन सावंत यांनी ग्रामस्थांसह महा प्रबंधक आर.व्ही. जानू यांची घेतली भेट*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴शिवापूर, दि-२५:-* शिवापूर गावातील बीएसएनएलच्या मोबाईल टॉवर ला रेंज नसल्यामुळे गेले कित्येक महिने संपर्कात व्यक्त येत आहे. बीएसएनएलच्या ढिसाळ कारभाराचे उत्तम उदाहरण म्हणून शिवापूर गावचा मोबाईल टॉवर आहे. ही मोबाईल टॉवरची सेवा तातडीने सुरळीत करा. अन्यथा जनतेच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल. असा इशारा आज सावंतवाडी येथे कुडाळचे माजी सभापती मोहन सावंत यांनी दिला.
बीएसएनएलच्या सावंतवाडी येथील मुख्य कार्यालयात मोहन सावंत यांच्यासह शिवपूरातील ग्रामस्थांनी जिल्हा महा प्रबंधक आर.व्ही. जानू यांची भेट घेतली. शिवापूर येथील बीएसएनएलच्या मोबाईल टॉवरची सद्यस्थिती समजावून सांगितली. यावेळी मोहन सावंत यांच्या सोबत शांताराम कदम ,अजित कडव ,भागोजी कदम ,रवींद्र गुरव (नेरुर),कौस्तुभ सावंत आदी उपस्थित होते.
शिवापूर येथे बीएसएनएल कंपनीचा मोबाईल टॉवर आहे मात्र त्याची रेंज मोबाईलला भेटत नाही. गेले पंधरा दिवस तर पूर्णतः टॉवरस बंद आहे. कधीतरी सुरू झाल्यास २ जी रेंज पूर्णता बंद पडलेली असते. तर ४ जी रेंज मोबाईल मध्ये दिसत असली तरी संपर्क होत नाही. त्यामुळे स्थानिक जनतेला संपर्कासाठी डोंगरदर्‍यांवर जाऊन बोलावे लागते. ही वस्तुस्थिती महा प्रबंधक आर.व्ही. जानू यांच्या निदर्शनास आणून दिली. येत्या चार दिवसात शिवापूर मोबाईल टॉवर पूर्ववत करा आणि संपर्काची होणारी गैरसोय दूर करा अन्यथा जनतेचा उद्रेक झाल्यास कोणीही जबाबदार राहणार नाही असा इशारा या शिष्टमंडळाने दिला आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!