जिल्ह्यात गृह मतदानाला सुरुवात
*🛑जिल्ह्यात गृह मतदानाला सुरुवात*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्गनगरी, दि-१६:-* मी ८६ वर्षीय असून मतदानाच्या दिवशी मला प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्यात अडचण येत होती. निवडणूक आयोगाने गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे आमच्यासारख्या वयस्कर व्यक्ती घरबसल्या मतदान करू शकतात, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, कुडाळ विधानसभा मतदारसंघातील ८६ वर्षीय मतदार शकुंतला सीताराम सामंत यांनी. झाराप येथील शकुंतला सामंत यांच्या निवासस्थानी जाऊन गृह मतदान पथकाने मतदानाची प्रक्रिया पूर्ण केली. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील हे देखील उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीसाठी ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग मतदारांना गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अनिल पाटील. यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने मतदानाचे नियोजन केले आहे. त्यानुसार कुडाळ विधानसभा मतदारसंघात निवडणूक अधिकारी ऐश्वर्या काळुशे, सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार वीरसिंग वसावे, शीतल जाधव यांनी १५ ते १७ नोव्हेंबरदरम्यान गृह मतदानाचे नियोजन केले आहे. या उपक्रमांतर्गत झाराप येथे गृह मतदानावेळी शकुंतला सामंत बोलत होत्या. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या निवडणुकीत ८५
वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग मतदार यांना गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार २६९ कुडाळ विधानसभा मतदारसंघात १५ ते १७ नोव्हेंबर रोजी ८५ वर्षांवरील ज्येष्ठ मतदार तसेच दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी नियोजन केले होते. झाराप येथील दिव्यांग व ८५ वर्षांवरील मतदारांनी गृहभेटीद्वारे मतदान करण्यासाठी ‘१२ ड’ हा फार्म भरून सादर केला होता. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील झाराप येथे ८५ वर्षांवरील ज्येष्ठ मतदार शकुंतला सामंत (वय ८६) यांनी तसेच दिव्यांग मतदार सहदेव गोविंद बिडिये यांनी गृहभेटीद्वारे मतदानाचा हक्क बजावला. यावेळी मतदान पथकात सूक्ष्म निरीक्षक प्रकाश पाताडे, मतदान अधिकारी विकास कुंभार, शैलेश मुळीक, पोलीस श्रीमती फर्नांडिस उपस्थित होत्या.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

