अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा सन्मान हा त्यांच्या कार्याचा गौरव; डॉ. हेमंत वसेकर
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : हार्दिक शिंगले
🎴सिंधुदुर्गनगरी,दि.२०: अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आज होत असलेला सन्मान हा त्यांच्या कार्याचा गौरव असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील नियोजन समितीच्या नुतन सभागृहामध्ये आज आदर्श अंगणवाडी पर्यावेक्षिका, सेविका व मदतनीस यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी डॉ. वसेकर बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष समिधा नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, महिला व बाल विकास समितीच्या सभापती माधुरी बांदेकर, शिक्षण व आरोग्य समितीच्या सभापती सावी लोके, समाज कल्याण समितीच्या सभापती शारदा कांबळे, सदस्या श्वेता कोरगांवकर, संपदा देसाई, पल्लवी राऊळ, पल्लवी झिमाळ, पंचायत समिती सदस्य सुप्रिया वालावलकर, ओरोस गावच्या सपरंच प्रिती देसाई, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, महिला व बाल विकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल पाटील, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनीत म्हात्रे, पुरस्कार प्राप्त अंगणवाडी पर्यावेक्षिका, सेविका आणि मदतनिस उपस्थित होत्या.
आज सभागृहात नारी शक्ती दिसून आली असल्याचे सांगून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर पुढे म्हणाले की, या नारी शक्तीने कोरोनाकाळात कोरोना युद्धा म्हणून चांगली कामगिरी बजावली आहे. त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. या पुरस्काराच्या निमित्ताने त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप हा त्यांचा गौरव होत आहे. अंगणवाडी सेविकांनी मागण्या करताना समाज हिताच्या मागण्यांना प्राधान्य द्यावे. त्यांच्या कामात निर्भयता असावी असे डॉ. वसेकर म्हणाले.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा समिधा नाईक म्हणाल्या की, लहान मुलांची आई आपल्या मुलांना निर्धास्तपणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडे सोपवतात. या सोपवण्यामागे त्या आईला विश्वास असतो की अंगणवाडी सेविका, मदतनीस या आपल्या मुलांप्रमाणे त्यांची काळजी घेतात. त्यांच्यावर असणारा हा विश्वासच महत्वाचा असतो.
यावेळी तीन अंगणवाडी मुख्य सेविका, ४९ अंगणवाडी सेविका, ४९ मदतनीस आणि ८ मिनी अंगणवाडी सेविका अशा एकूण १०९ कर्मचाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते आदर्श अंगणवाडी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
सुरुवातीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व राजमात जाजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
*_🔥सावंतवाडीकरांसाठी खुशखबर..🔥_*
*🤷🏻♂️सावंतवाडीत प्रथमच सर्व प्रकारच्या🥻साड्या रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करून मिळण्याची सुविधा..🤷🏻♀️*
*_🥻साड्यांना रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करायच्या आहेत? मग गोवा बेळगावला पाठविण्याची गरज नाही!🙅🏻♂️_*
*🏬नाईक काॅम्पलेक्स खासकीलवाडा गाळा नं २, शाळा नं. ४ च्या खाली असलेल्या रसीक लाॅंड्री मध्ये आपले कपडे द्या! व निवांत रहा!💃*
🧥🥼🦺👚👕👖👔👗👘
_💫सुट शेरवानी, शर्ट, पॅन्ट ड्रायक्लिनींग व प्रेस करून मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण म्हणजे *रसीक लाॅंड्री..*_
*⚡संर्पक : अमीत राऊळ*
*📱मोबाईल : ९६५७०९०९२७*
*📱व्हाट्सअप : ९४०५०६०९३७*
*_💥त्याचप्रमाणे आमच्याकडे सर्व प्रकारचे घाऊक पीठ उपलब्ध💥_*
*🔥समृध्दी गृह उद्योग प्रकल्प🔥*
_💫 उत्कृष्ट दर्जाचे तांदूळ, गहू, ज्वारी, बेसण, नाचणी, मकापीठ होलसेल दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण.._
*🏬आमचा पत्ता :*
नाईक काॅम्पलेक्स, गाळा नं. २, शाळा नं. ४ च्या खाली खगसकीलवाडा, सावंतवाडी, जिल्हा. सिंधुदुर्ग.
*⚡प्रो.प्रा. अरुण गावडे*
*📱मोबाईल : ८२७५०३७४०८*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_