प्रेमानंद स्वामी कुडाळकर महाराज यांच्या ११व्या पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
*🛑प्रेमानंद स्वामी कुडाळकर महाराज यांच्या ११व्या पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-०५:-* ओटवणे येथील प पू प्रेमानंद स्वामी कुडाळकर महाराज यांच्या ११ व्या पुण्यतिथी उत्सवा निमित्त मंगळवार १२ नोव्हेंबर रोजी समाधी मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
प पू प्रेमानंद स्वामी कुडाळकर महाराज माणगाव येथील दत्त निवासी प पू परिवज्रकाचार्य श्री परमपूज्य टेंबे स्वामी महाराज यांच्या थोर गुरुपरंपरेतील वैद्यराज परमपूज्य बाबा महाराज मानवतकर महाराज यांचे पट्ट शिष्य होते. कुडाळकर महाराज यांच्या पुणे गोखलेनगर येथील श्री दत्त सदनाय गेल्या ५७ वर्षांपासून श्री गुरुचरित्र अखंड पारायण सप्ताह, श्री दत्त जयंती, श्री दत्त याग, गुरुपौर्णिमा आदी कार्यक्रम अखंडपणे सुरू आहेत. गुरुकृपेने त्यांनी आयुर्वेदाच्या माध्यमातून हजारो रोगी बरे करताना असंख्य लोकांना व्यसनमुक्त करून त्यांच्या कुटुंबांचे कल्याण केले. त्यांचे देशभरासह जर्मनी, अमेरिका, युरोप, मॉरीशिअस आदी परदेशात हजारो प्रचंड शिष्यवर्ग आहे.
यानिमित्त समाधी मंदिरात पहाटे ५ वाजता काकड आरती, सकाळी ९ वाजता सर्व देवतांचे पूजन, सकाळी १० वाजता प पू प्रेमानंद स्वामी महाराजांच्या मूर्तीला महाअभिषेक, सकाळी ११ ते वाजता पिंपरी संत तुकारामनगर येथील श्री गुरुदत्त प्रासादिक भजनी मंडळाचे सुश्राव्य वारकरी सांप्रदायी भजन ह.भ.प. श्री. अशोक महाराज गुरव, श्री गोरक्षनाथ महाराज टाव्हरे व ह. भ. प. चंद्रकांत महाराज घोडे हे सादर करणार आहेत. दुपारी १२:३० वाजता महाआरती, दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ५ वाजता वारकरी सांप्रदायिक हरीपाठ, सायंकाळी ७ वाजता आरती, रात्री ८ वाजता ह. भ. प. टाव्हरे महाराज (मंचर) यांचे वारकरी सांप्रदायिक किर्तन होणार असून संगीत साथ पिंपरी पुणे येथील श्री गुरुदत्त प्रासादिक भजनी मंडळाची आहे. ओटवणे कापईवाडी येथील श्री गणेश प्रासादिक भजनी मंडळाचाही यात सहभाग आहे. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन परमपूज्य प्रेमानंद स्वामी कुडाळकर महाराज समाधी मंदिर ट्रस्टचे विश्वस्त अँड सुरेंद्र माळगावकर आणि डॉ अनिकेत कुडाळकर यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_