कणकवलीकोकणमहाराष्ट्र

शस्त्र परवानाधारक प्रशासनाकडून वेठीस

*🛑शस्त्र परवानाधारक प्रशासनाकडून वेठीस*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-०४:-* विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शस्त्र परवानाधारकांना शस्त्रे जमा करण्याबाबत कळविण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानाधारकांना नोटिसा काढून शस्त्रं जमा करण्यात का येऊ नयेत, याबाबत खुलासा पोलीस ठाण्यामार्फत मागण्यात आला. मात्र, हा खुलासा सादर करूनही खुलासा मान्य झाला किंवा अमान्य झाला, याबाबत परवानाधारकांना काहीही कळविण्यात आलेले नाही. उलट आताही केवळ फोनवर पोलीस पाटील अथवा अंमलदारांकडून शस्त्र जमा करण्यात यावी, असे सांगण्यात येत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार सरसकट शस्त्रे जमा करण्यापासून सुट देण्यात आली होती. ज्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, त्यांची स्क्रिनिंग कमिटीद्वारे छाननी करून कार्यवाही होणार असल्याचे सांगितले जात होते. लोकसभा निवडणुकीलाही सरसकट शस्त्रे जमा करून घेण्यापासून सुट देण्यात आली होती.अनेकांचे आत्मसंरक्षण
व शेती संरक्षण परवाने आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्यांकडून आत्मसंरक्षण परवान्याचे शस्त्र
जमा करून घेण्यामागचा उद्देश काय, असा सवाल उपस्थित होत आहे. तर सध्या भातशेती तयार आहे. मात्र, पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच वन्य प्राण्यांपासून शेतीचे नुकसान होत असून त्यांना हुसकावून लावण्यासाठी शस्त्रे असणे आवश्यक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रानुसार परवानाधारकांना आचारसंहिता संपेपर्यंत आपली शस्त्रे पोलीस ठाण्यात जमा का करण्यात येऊ नयेत, याबाबतचा खुलासा पोलीस निरीक्षकांमार्फत देण्याबाबत नोटीस काढण्यात आली. त्यानुसार काहींनी खुलासे दिले. मात्र, हे खुलासे देऊनही सध्या पोलीस पाटील अथवा अंमलदारांकडून शस्त्र जमा करण्याबाबत तोंडी सूचना देण्यात येत आहेत. जर प्रशासनाने खुलासे मागितले होते, तर मग हे खुलासे मान्य किंवा अमान्य याबाबत परवानाधारकांना कळविणे आवश्यक आहे. मात्र, अशी कार्यवाही न करताच तोंडी सूचनांद्वारे शस्त्र जमा करण्यास सांगण्यात येत असल्याने या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. प्रशासनाच्या विभागांचा आपापसात ताळमेळ नसल्यानेच सर्वसामान्य शेतकरी, परवानाधारकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!