मतदारसंघात दोन अनिष्ट प्रवृत्ती वावरत आहेत-दिपक केसरकर
माझा सावंतवाडी मतदारसंघ शांतताप्रिय मतदारसंघ आहे तो तसाच राहिला पाहिजे यासाठी माझे प्रयत्न आहेत,या मतदारसंघात एक नव्हे तर दोन अनिष्ट प्रवृत्ती वावरत आहेत त्यांना हद्दपार करावे असे आवाहन केसरकर यांनी जनतेला केले.
मी मतदारसंघाचा जो कायापालट केला तो मतदारसंघात फिरल्यावरच दिसेल,जो मतदारसंघात फीरत नाही त्याला विकास कसा दिसणार असा सवाल केसरकर यांनी विरोधकांना केला,मराठी भाषा सातासमुद्रापार पोहचवली,मला मराठी माणसांचा अभिमान आहे म्हणून हे केले असे केसरकर यांनी स्पष्ट केले.

