आणखीसामाजिक

सांगेली देवकरवाडी येथे दीपावली निमित्त दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन

*सांगेली देवकरवाडी येथे दीपावली निमित्त दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन* ;-

शुक्रवार दिनांक १ नोव्हेंबर २०२४ रोजी सांगेली देवकरवाडी (चव्हाटा)येथे खास दिपावली निमित्त दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यानिमित्त सकाळी साडेपाच वाजता अभंग भक्ती गीत ,भावगीत नाट्यगीतांची सुरेल मैफल होणार आहे. या कार्यक्रमासाठी गायक श्री अंकुश सांगेलकर( सांगेली),गायिका भक्ती नाईक (कुडाळ) हार्मोनियम वादक श्री संदेश बांदेलकर( कुडाळ) तबलावादक श्री अक्षय सरवणकर (तळवडे) पकवात -प्राजक्ता परब (गोवा) सिंधेसायझर महेश तळगावकर( मालवण ) या कलाकारांसोबत संगीत मैफल होणार आहे.हा कार्यक्रम नवतरुण कला क्रीडा मंडळ देवकरवाडी व ग्रामस्थांनी आयोजित केला आहे. तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!