विविध स्पर्धांमध्ये पणदूर विद्यालयाचे यश
*🛑विविध स्पर्धांमध्ये पणदूर विद्यालयाचे यश*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴पणदूर, दि-२४:-* राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा संकुल (ओरोस) येथे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये शिवाजी इंग्लिश स्कूल (पणदूर तिठा) च्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत सहावीची विद्यार्थिनी स्वरा गावडे हिने २०० मी., ४०० मी. फ्री स्टाईल व ५० मी. बॅकस्ट्रोक या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक मिळवित कोल्हापूर विभागीय जलतरण स्पर्धेत स्थान मिळविले आहे. तसेच १४ व १७ वर्षे वयोगटातील रग्बी स्पर्धेत मुलांच्या संघानेही अव्वल स्थान पटकावून दोन्ही संघांनी विभागीयस्तरावर मजल मारली आहे. १७ वर्षांखालील गटात सागर निकम-प्रथम, वनिता चंदू निकम-द्वितीय तसेच १४ वर्षांखालील उर्जा पवार-द्वितीय, रोहन निकम-द्वितीय यांची मल्लखांब स्पर्धेत विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. १९ वर्षांखालील जिल्हास्तरीय शूटिंगबॉल स्पर्धेत कोल्हापूर येथील विभागस्तरावर निवड झाली आहे. जिल्हास्तरीय थ्रो बॉल स्पर्धेत १७ व १९ वर्षांखालील मुलांनी विभागस्तरावर मजल मारली आहे. जिल्हास्तरीय हँडबॉल स्पर्धेत सलग तिसऱ्या वर्षी मुलींच्या संघाने विभागस्तरावर मजल मारली आहे. या सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक अमित भाटकर यांचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापक संजय मालवणकर, संस्थाध्यक्ष रघुनाथ गावडे, सचिव नागेंद्र परब, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांनी या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

