बाबा सिद्यिकींच्या हत्येचा घटनाक्रम पोलिस जाहिर करतात तर मग छत्रपतींच्या पुतळ्याच्या घटनेचे काय झाले?-धिरज परब

*🛑बाबा सिद्यिकींच्या हत्येचा घटनाक्रम पोलिस जाहिर करतात तर मग छत्रपतींच्या पुतळ्याच्या घटनेचे काय झाले?-धिरज परब*

*🛑वेल्डरला अटक करुन काय साध्य ?*

*🛑पोलिसांवर कोणत्या राजकारणांचा दबाव*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कुडाळ, दि-२१:-* राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते तथा माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर अवघ्या काही तासात मुंबई पोलिसांनी हत्येच्या मुळापर्यंत जात सर्व घटनाक्रम जाहिर केला. माध्यमांनीही तो घटनाक्रम ठळकपणे प्रसारीत केल्यामुळे आम जनतेपर्यंत त्या घटनेची संपुर्ण माहिती मिळाली. मात्र अखंड महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवण राजकोट येथील पुतळा कोसळला. याबाबत पुतळ्याशी संबंधित ठेकेदार जयदीप आपटे व अधिकारी चेतन पाटील यांना अटक झाली पण त्या घटनेबाबतची परिपूर्ण माहिती अद्यापपर्यंत पोलिस प्रशासनाने का जाहीर केली नाही? पोलिस प्रशासनावर कोणत्या राजकारण्यांचा दबाव आहे? असा सवाल मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी उपस्थित केला आहे.
जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी असे म्हटले आहे की, नौदल दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या उभारण्यात आलेला पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. मात्र पुढच्या आठ महिन्यात तो पुतळा कोसळला आणि तमाम महाराष्ट्रातील जनतेची मने दुखावली, व्यतीत झाली. एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेले कडेकोट किल्यांचे अनेक बुरूंज, दगड आजही जैसे थेच आहेत. मालवणच्या किल्यातील बांधकाम ( तटबंदी) 400 वर्षानंतरही समुद्राच्या लाटा झेलत अभैद्य आहे, असे असताना अवघ्या आठ महिन्यात छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळतोच कसा?, बरं या घटनेनंतर पोलिसांनी केवळ औपचारीकता म्हणून ठेकेदार जयदीप आपटे व अधिकारी चेतन पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली. हे दोघेही पोलिस कोठडीनंतर आता न्यायालयीन कोठडीत आहेत. दुसरीकडे या घटनेत वेल्डरला पोलिसांनी ताब्यात घेवून अटक केली. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने त्याला तीन दिवसाच्या पोलिस कोठडीत ठेवले. यावेळी पोलिसांनी काय तपास केला? वेल्डरला ताब्यात घेणे म्हणजे चोर सोडून सन्यासाला फाशी देण्याचा हा प्रकार आहे. खरं तर पुतळ्याचे हे काम 2 कोटी 44 लाख रूपयाचे होते. याची निविदा इंडीयन नेव्ही ने काढून ठेकेदाराला वर्क ऑर्डर दिली होती. त्याचे पैसे सार्वजनिक बांधकाम विभागाने नेव्ही कडे वर्ग केले होते. अशा प्रकारची ही अजब कामाची गजब निविदा होती. विशेष म्हणजे या निविदेतील अंदाजपत्रकीय रक्कमेपैकी केवळ 36 लाख रूपये ठेकेदार जयदीप आपटेला मिळाल्याचे आपटे यांनी आपल्या पोलिस जबाबात सांगितले आहे. मग उरलेली रक्कम कुणाच्या खिशात गेली? आपटे या घटनेनंतर कुणा कूणाच्या संपर्कात होता? त्याचे फोन रेकॉर्ड, सिडीआर पोलिसांनी तपासले का? तपासले तर ते रेकॉर्ड पोलिसांनी माध्यमांच्या वतीने जनतेसमोर का जाहिर केले नाही? माजी मंत्री बाबा सिद्यिकीच्या हत्येनंतर अवघ्या काही तासात मुंबई पोलिस सर्व घटनाक्रम जाहिर करू शकतात तर मग आमच्या महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत दुर्घटना होवून सुध्दा पोलिस प्रशासन सुस्त का? या पोलिसांवर कोणत्या राजकीय प्रमुख मंडळींचा दबाव आहे? असा सवाल उपस्थित होत असून जर पोलिस यंत्रणेवर कुणाचाच दबाव नसेल तर पोलिसांनी बाबा सिद्यिकींच्या हत्येनंतर ज्या पध्दतीने घटनाक्रम शोधून काढला व माध्यमांसमोर जाहिर केला तसाच घटनाक्रम व माहिती पोलिसांनी जाहिर करावी अशी मागणी श्री. परब यांनी केली आहे. दरम्यान या घटनेबाबत सामाजिक कार्यकर्ते जनहीत याचिका दाखल करण्याच्या तयारीत असल्याचेही श्री. परब यांनी या सांगितल आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!