देशासाठी जो सीमेवर लढला तो लोकप्रतिनिधी व उदासीन प्रशासना समोर मात्र हरला….
*🛑 देशासाठी जो सीमेवर लढला तो लोकप्रतिनिधी व उदासीन प्रशासना समोर मात्र हरला……**
*🛑 घरी जाण्यासाठी रस्ता नसल्याने आजारी माजी सैनिकाचा दुसऱ्याच्या घरी आसरा……..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत*
*🎴सावंतवाडी, दि२१ऑक्टोबर- :-*
ज्याने जीवावर उदार होऊन देशाच्या सीमा लढवल्या त्या माजी सैनिकाला आज रस्ता नसल्यामुळे आजारी अवस्थेत दुसऱ्याच्या घरी आसरा घ्यावा लागत आहे. ही दुर्दैवी घटना आंबोली घाटाच्या पायथ्याशी असलेल्या गावात घडली असून या गावातील माजी सैनिक आज ७०वर्षाचे असून त्यांचे शारीरिक स्वास्थ बिघडल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मधुमेहामुळे त्यांच्या पायाला झालेली जखम बरी होत नसल्याने बरेच दिवस रुग्णालयात राहून त्यांनी घरी जाण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांच्या घराकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने घरापासून एक किलोमीटर अंतरावर असणाऱ्या एका दुसऱ्या ग्रामस्थांच्या घरात त्यांची राहण्याची सोय करावी लागत आहे. दररोज डॉक्टर कडून मलमपट्टी करावी लागत असल्याने कुटुंबीयांना हा निर्णय घ्यावा लागला. दुर्दैव म्हणजे या वाडीवर जाणारा रस्ता बारा वर्षांपूर्वी ग्रामपंचायत मध्ये नोंद केला आहे. मात्र त्यानंतर दहा वर्षे या ठिकाणी विद्यमान आमदारांचे समर्थक सरपंच होते त्यांनी दहा वर्षात एक रुपया देखील या वाडीवर रस्त्यासाठी खर्च केला नाही. तसेच सदर रस्त्याचा प्रस्ताव शासन दरबारी पाठविला नाही. वर्षात गेल्या वर्षी विराजमान झालेल्या सरपंचांनी ग्रामपंचायत मधून एक लाख रुपये खर्च करून या वाडीवर जाणारा 90 मीटर रस्ता दुरुस्त केला. मात्र एवढा निधी पुरेसा नसल्याने या वाडीवरील वाहतूक पूर्णपणे बंद आहे. शासन माजी सैनिकांबाबत बरेच संवेदनशील आहे मात्र येथील स्थानिक प्रशासन तसेच लोकप्रतिनिधी च्या उदासनेतेमुळे आज या माजी सैनिकावर अशी दुसऱ्याच्या घरात राहण्याची वेळ आली आहे. आता निवडणुकीच्या धामधुमीत सगळेच उमेदवार अनेक आश्वासनांची खैरात करत असतात. मात्र निवडणुकीनंतर “येरे माझ्या मागल्या” प्रमाणे सामान्य नागरिकांची ससेहोलपट होत असते. बेळगाव वेंगुर्ले महामार्गापासून केवळ एक किलोमीटर अंतरावर असणाऱ्या माजी सैनिकाच्या घरापर्यंत जंगलातून रस्ता आहे. दिवसा ढवळ्या या ठिकाणी जंगली प्राण्यांचा सतत वावर असतो रात्रीच्या वेळी तर या वाडीवरील लोक जीव मुठीत घेऊन आपल्या घराकडे जात असतात. या ठिकाणी मोजकीच सहा सात घरे असून पावसाळ्यात येथील वाहतूक पूर्णपणे बंद असते. तब्बल एक किलोमीटर चालत येण्याशिवाय कुठलाही पर्याय या वाडीतील लोकांकडे नाही. मात्र कुठल्याही कठीण परिस्थितीत जगण्याची कला अवगत असणाऱ्या व याची शिकवण सैनिकी प्रशिक्षणात मिळाल्याने सदर कुटुंबीयांची पावसाळा संपल्यानंतर नक्कीच आपल्या घरी जाऊ अशी आशा व्यक्त केली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_