नगराध्यक्षा सुरेखाताई खेराडे यांच्या प्रभागातील रस्त्याचे जल्लोषात भूमिपूजन संपन्न..
▪️वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले काम मार्गी लागल्याने नागरिकांनी मानले नगराध्यक्षा, नगरसेवकांचे आभार
▪️गुहागर नाका ते उक्ताड मराठी शाळा रस्ता चांगल्या दर्जाचा व्हावा; नगराध्यक्षा सुरेखाताई खेराडे यांची ठेकेदाराला सूचना..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴चिपळूण,दि.१८: नगरपरिषदेच्या विशेष रस्ता अनुदानाअंतर्गत शहरातील प्रभाग क्र.९ मधील सुमारे ९१ लाख ३०० रुपये खर्चाच्या उक्ताड गुहागर नाका ते उक्ताड मराठी शाळा रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन सोमवारी स.११ वा चिपळूण च्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सुरेखाताई खेराडे ,स्थानिक नगरसेवक व नागरिकांच्या हस्ते संपन्न झाले,
या रस्त्याचे काम हाती घेतलेल्या ठेकेदार कांबळे नी या आधी गोवळकोट मध्ये चांगले काम केले आहे,या प्रमाणेच ठरलेल्या अंदाजपत्रक नुसारच याही रस्त्याचे काम दर्जेदार व्हायला पाहिजे ठरलेल्या दारातच काम पूर्ण करून द्यायचे आहे यात पालिकेकडून कोणत्याही प्रकारची वाढीव रक्कम मिळणार नाही अशी स्पष्ट सूचना देऊन किमान १५ वर्ष हा रस्ता टिकला पाहिजे असा स्पष्ट आदेश नगराध्यक्षा सुरेखाताई खेराडे यांनी या वेळी आपल्या भाषणात बोलतांना ठेकेदार गणेश कांबळी यांना दिला,हा रस्ता पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग होता पालिकेच्या ताब्यात आल्या शिवाय याचे नव्याने काम करणे शक्य न्हवते मागील अनेक वर्षे आपण आणि स्थानिक नगरसेवक प्रशासनाकड़े पाठपुरावा करीत आलो आहोत,त्यामुळेच आज हे काम मार्गी लागतांना आनंद होत आहे,या कामी सहकार्य करणाऱ्या सर्व नगरसेवकांचे मनापासून आभार मानते असे नगराध्यक्षा सुरेखाताई खेराडे यांनी यावेळी बोलतांना सांगितले.
रस्ता भूमिपूजन कार्यक्रमात आरोग्य सभापती शशिकांत मोदी ,नगरसेवक मोहन मिरगल, विजय चितळे,नसिरभाई खोत,लायन्स क्लब चे माजी अध्यक्ष राजेंद्र वेस्विकर, श्री.विलास कदम ,संतोष भोसले यांनी आपले मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या, येथील रहिवासी मंडळींची या रस्त्याकरीता पालिकेकडे वारंवार मागणी होत होती,रस्त्याची फारच दुरवस्था झाली होती अखेर नगराध्यक्षा सुरेखाताई खेराडे आणि स्थानिक नगरसेवकांनी शासनाकडे पाठपुरावा केल्यामुळेच अखेर प्रशासकीय लेखा जोगा पूर्ण होऊन निधी उपलब्ध झाल्यावर या रस्त्याचे काम मार्गी लागले आहे, येथील नागरिकांनी नगराध्यक्षा आणि स्थानिक नगरसेवकांचे आभार मानून समाधान व्यक्त केले आहे,या कार्यक्रमाला शिवसेना गटनेते मागासवर्गीय समिती सभापती उमेश सकपाळ,बांधकाम सभापती मनोज शिंदे,पाणी सभापती बिलाल पालकर,महिला बाल कल्याण सभापती सुमय्या फकीर,जेष्ठ नगरसेवक सुधीर शिंदे,अविनाश केळस्कर,रसिका देवळेकर,आशिष खातू,उद्योजक नितीनशेठ खेराडे,नगरसेवक विजय चितळे,परिमल भोसले,सफा गोठे,वर्षा जागुष्टे, स्वाती दांडेकर,भगवान बुरटे,संजीवनी शिगवण,नुपूर बाचीम,रश्मी गोखले,भाजपा तालुका अध्यक्ष विनोद भोबसकर, रामदास राणे , सुनीत खेराडे,बाबू खेराडे,प्रणय वाडकर,नगर अभियंता परेश पवार ,ठेकेदार गणेश कांबळे,व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या वेळी नगर अभियंता परेश पवार आणि उपस्थित मान्यवर मंडळींचा नगराध्यक्षा सुरेखाताई खेराडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंत मोरे यांनी केले, महालक्ष्मी मित्रमंडळ,कालभैरव मित्रमंडळ,उक्ताड गणेश मित्रमंडळ, कालिकादेवी मित्रमंडळ, कालिका माता महिला
बचत गट,उक्ताड महिला मंडळ तसेच उक्ताड कानसेवाडी येथील महिला मंडळ,बचत गटाच्या महिलांनी नगराध्यक्षा खेराडे यांचे अभिनंदन केले,या कार्यक्रमला विलास खेराडे, इब्राहिम दलवाई,माजी नगरसेवक मिलिंद कापडी,महम्मद फकीर,राजेंद्र वेस्विकर,महेश वेस्विकर,सूर्यकांत चिपळूणकर,राम गोरीवले,वैभव चिपळूणकर,मंगेश वेस्विकर,अनंत किंजळकर, विलास कदम,विलास कांबळे,वसंत घाणेकर,शेखर खेराडे,किसन चिपळूणकर,मंदार फडतरे,अमोल निर्मळ,विपुल बुरटे, संदीप भोसले,संदीप जोगळे, रुपेश दिवाळे,वैभव निर्मळ ,संजय जोगळे,मंदार फटकुरे, अभिषेक बुर्ते, गणेश भुवद, सुधीर पंकर अप्पा देसाई, अविनाश कमलाकर,राजेश्वर खरे , दिनेश भोसले रूपेश दिवाळे, बाबा गोरीवाले, महेंद्र कदम ,उल्लास भोसले, गणेश माळी सूरज निर्मल अल्पेश किंजळकर, नितीन गोवळकर शुभेश गोवळेकर, गणेश बुरटे, राकेश फटकुरे, आदी उपस्थित होते.
_*🔥हदयरोगावरील सर्व विनाशस्त्रक्रिया उपचारासाठी भारतातील उत्कृष्ठ प्रिव्हेटिव्ह कार्डिओलाॅजी सेंटर..🏥*_
*💥मंगळवार दि. १९ जाने. २०२१ रोजी..*
*💫सकाळी १० ते दुपारी १ चिपळूण..*
*💫दुपारी ३ ते सायं. ६ रत्नागिरी..*
♨️ (नावनोंदणी आवश्यक) ♨️
_🌈डॉ.जयवंत खबाले हृदयाची कार्टोग्राफी करतील व आर्टेरियल क्लिअरन्स थेरपीने उपचार करतील.._
_🌈गेल्या २० वर्षात हजारो हदयविकार रूग्णावर विनाशस्रक्रिया यशस्वी उपचार.._
_🤷🏻♂️बायपास टाळा.. ॲन्जिओप्लास्टी टाळा.. हृदयविकार टाळा.. निरोगी राहा..🤷🏻♀️_
*🏬 आमचा पत्ता ⬇️*
*🏥 शनिकृपा हार्टकेअर सेंटर*
⭕प्रविण मलुष्ठे बंगल्यासमोर, साळवी स्टॅाप, नाचणे, रत्नागिरी.
⭕दिपक लॅाजच्या पाठीमागे, भोगाळे, चिपळूण.
*💁🏻♂️ संपर्क ⬇️*
*📱9689008081*
*📱9960316318*
_⭕Arterian Therapy, EECP, Chelation Therapy, Vit-C Therapy, Ozone Therapy, Ayurveda._
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_