वेत्ये – सोनुर्ली मार्गावरील कोकण रेल्वेचा “तो” उड्डाणपुल बनला धोकादायक
*🛑वेत्ये – सोनुर्ली मार्गावरील कोकण रेल्वेचा “तो” उड्डाणपुल बनला धोकादायक*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :नितिन गावडे*
*🎴सावंतवाडी, दि-१९:-* वेत्ये गावातून सोनुर्ली येथे जाण्यासाठी बनवलेला कोकण रेल्वे मार्गावरील उड्डाणपुल धोकादायक बनला आहे.
वेत्येमधील कोकण रेल्वेचा उड्डाणपूल हा मळगाव, वेत्ये व सोनुर्ली या गावांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. सोनुर्ली, न्हावेली, निरवडे व पुढे जाणारी वाहने याच उड्डाणपुलावरून जात असतात. शिवाय स्थानिकांच्या वाहनांची वर्दळ या पुलावरून होत असते.
मात्र, गेल्या दोन-तीन महिन्यांत पडत असलेल्या पावसामुळे पाणी साचून उड्डाणपुलावरील रस्ता खड्डेमय झाला असून केवळ खड्डे बुजविण्यापुरती स्थिती या रस्त्याची नसून उड्डाणपुलावरील संपूर्ण रस्त्यावर नव्याने हॉटमिक्सिंग करण्याची गरज आहे, या उड्डाणपुलाखाली कोकण रेल्वे ची उच्च विद्युतभार क्षमतेची इलेक्ट्रीक लाईन असल्याने त्या उड्डाणपुलावरुन वाहतूक करणे धोकादायक बनले आहे. सदर पुल हा कोकण रेल्वे च्या अखत्यारीत येत असल्याने यावर सार्वजनिक बांधकाम विभाग व कोकण रेल्वे यांनी यापुलाची पाहणी करून गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
पुढील महिन्यात दक्षिण कोकण चे पंढरपूर म्हणून ओळखले जाणाऱ्या सोनुर्ली येथील श्री देवी माऊली मंदिरचा जञोत्सव होणार आहे त्यावेळी या उड्डाणपूलावरुन मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते, त्यामुळे अश्या धोकादायक उड्डाणपूलावरुन प्रवास करताना अपघात घडल्यास याला जबाबदार कोण राहणार असा प्रश्न सोनुर्ली, वेत्ये, मळगाव, निरवडे गावातील नागरीकांनी विचारला आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

