कौशल्य विकास विभागाच्या योजनांचा जिल्ह्यातील युवकांनी लाभ घ्यावा..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : सिंधुदुर्गनगरी
🎴सिंधुदुर्गनगरी,दि.18: स्थानिक, राष्ट्रीय व जागतिक पातळीवर विविध क्षेत्रातील रोजगाराच्या संधीच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेमध्ये शाश्वत वृद्धी होण्याच्या दृष्टीने प्रशिक्षीत व कुशल मनुष्यबळासाठी तरुणांना बदलत्या अधुनिक तंत्रज्ञानानुरूप कौशल्याधारित प्रशिक्षणाद्वारे उत्पादनक्षम बनविण्याच्या दृष्टीने कौशल्य विकास कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत 15 ते 45 वयोगटाली उमेदवारांना व्यावसायिक कौशल्य विकास, कौशल्यवर्धन व पुर्नकौशल्य विकास करणे, त्यांना रोजगारक्षम करून नोकरी किंवा स्वयंरोजगार मिळवून देण्यात येत आहे.
जिल्ह्यामध्ये विशेषतः कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान योजना, प्रमोद महाजन कौशल्य उद्योजकता विकास अभियानाअंतर्गत किमान कौशल्य विकास कार्यक्रम जिल्हास्तरावर राबविण्यात येत आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सुनिल पवार, सहाय्यक आुयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सिंधुदुर्ग यांनी केले आहे.
कौशल्य विकास विभागामार्फत डिसेंबर 2020 अखेर राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान योजनेमध्ये एकूण 647 उमेदवारांची नोंदणी झाली आहे. त्यापैकी 184 उमेदवारांना नोकरी उपलब्ध झाली आहे. तर 5 उमेदवारांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियानामधअये एकूण 474 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 143 जणांना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. तर किमान कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत 327 जणांची नोंदणी झाली. तर 47 जणांना नोकरीची संधी उपलब्ध झाली आणि 42 व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय उभारला आहे.
*_💥सावंतवाडी शहरात तुकाराम परब यांचे दर्जेदार चिकन सेंटर.._💥*
*🔥ग्रंथा चिकन सेंटर🔥*
_🌈आमच्या येथे बॉयलर व गावठी कोंबडी विकत मिळतील.._
*🤷🏻♂️आमचा पत्ता ⬇️*
प्रोप्रायटर – तुकाराम परब
पाटणकर-चौगुले तिठा, बिरोडकर टेंब, बाबा बिरोडकर मार्ग, न्यू सबनीस वाडा, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.
*💁🏻♂️मोबाईल नंबर ⬇️*
*_📱९४२०२६१५८४_*
*_📱९४०३७०१५८५_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
