परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांसमोर संकट
*परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांसमोर संकट*
*बळीराजाची धाकधुक वाढली, भात कापणी खोळंबली*
* KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
* प्रतिनिधी :नितिन गावडे*
*सावंतवाडी, दि-१५-:* आठवडाभरापासून सातत्याने बदलणाऱ्या लहरी हवामानाचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे. मडुरा पंचक्रोशीसह सावंतवाडी तालुक्यात सोमवारी संध्याकाळी ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला. ऐन भातकापणीच्या हंगामातच पावसाने एन्ट्री केल्याने शेतकऱ्याची तारांबळच उडाली. अतिवृष्टीतून वाचलेले भातपिक पदरात पाडून घेण्यासाठी शेतकऱ्याची धावपळ दिसून आली.
सातार्डा, आरोस, न्हावेली, कोंडुरा, पाडलोस, मडुरा, रोणापाल, निगुडे, कास, सातोसे, शेर्ले, बांदा भागात सोमवारी संध्याकाळी अचानक मेघगर्जनेसह वादळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी भात कापणी केलेले पिक गोळा करताना शेतकऱ्याची तारांबळ उडाली. मात्र, पाऊस जोरदार बरसल्याने शेतकऱ्यांना हातातील कोयती त्याच ठिकाणी ठेवून घर गाठावे लागले. परिणामी भातकापणी मात्र खोळंबली. पुढील काही दिवस असेच वातावरण राहिल्यास शेतकऱ्याला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार असल्याचे न्हावेली-रेवटेवाडी येथील शेतकरी सुनील परब यांनी सांगितले.
शेतकऱ्यासमोर दुहेरी संकट
शेतातील कापणीयोग्य पिकलेल्या भाताची पावसाच्या भितीने उशिरा कापणी केल्यास लोंब गळून नुकसान होणार आहे. दुसरीकडे कापणी वेळेवर केल्यास भातपीक परतीच्या पावसात भिजून नुकसान होणार. दोन्हीकडून शेतकऱ्याचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यास निसर्गाच्या दुहेरी संकटाचा सामना करावा लागणार हे मात्र निश्चित, असे शेतकऱ्यांनी सांगितले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….*
_________________________
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..
_*
*_गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..
_*
* कोकण लाईव्ह ब्रेकिंग
*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
* जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….
*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*संपर्क : +919405475712*
*मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*कोकण लाईव्ह फेसबुक पेज
*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*कोकण लाईव्ह युटयूब चॅनल
*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*कोकण लाईव्ह वेबसाईट
*
*कोकण लाईव्ह इंस्टाग्राम
*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*कोकण लाईव्ह टेलिग्राम
*
https://t.me/kokanlive
*कोकण लाईव्ह ट्विटर
*
Tweets by LiveKokan
* कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_