आणखीमहाराष्ट्रमुंबईराजकीय

🛑 राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते बाबा सिद्दीकी यांचा गोळीबारात मृत्यू ; राज्यात खळबळ

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴मुंबई , दि – १३:- अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांचा गोळीबारात मृत्यू झाला आहे. बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. एसआरए प्रकल्पाच्या वादातून ही घटना घडल्याचे बोललं जात आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर 3 ते 4 राऊंड फायर करण्यात आले. यातील एक गोळी त्यांच्या छातीला लागली. यानंतर त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

नेमकं काय घडलं?

 

बाबा सिद्दीकी यांच्यावर काल (१२ ऑक्टोबर) रात्री 9.15 च्या सुमारास गोळीबार झाला. वांद्रे पूर्व येथील बाबा सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळील राम मंदिराजवळ हा गोळीबार झाला. निर्मल नगर भागात फटाके वाजत असताना बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाला होता. बाबा सिद्दीकी यांच्यावर दोन ते तीन राऊंड फायर झाले होते. यातील एक गोळी ही बाबा सिद्दीकी यांच्या छातीला लागली.

या घटनेनंतर त्यांना तातडीने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाल्याचे वृत्त समजताच त्यांचे पुत्र झिशान सिद्दीकी यांनी तातडीने लिलावती रुग्णालयात धाव घेतली. तसेच अभिनेता संजय दत्त ही लिलावती रुग्णालयात झाला होता. त्यासोबतच राष्ट्रवादीचे अनेक नेतेही लिलावती रुग्णालयात दाखल होत आहे.

 

बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळच हा गोळीबाराचा प्रकार घडला.

 

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!