चौकुळ येथे विजेचा लोळ पडून चार जनावरे ठार..
*🛑 चौकुळ येथे विजेचा लोळ पडून चार जनावरे ठार..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴आंबोली, दि-१२:-* चौकुळ आडयाष्टा येथे पाण्यात वीज पडून तीन दुभत्या गुजर म्हशी आणि एक रेडा मृत्युमुखी पडला. ही घटना गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. यातील एक म्हैस आणि रेडा, तर विजेच्या लोळाने जळून खाक झाले. अन्य दोन म्हशी पाण्यातच लुळ्ळ्या पडल्या. त्यामुळे तेथील विठ्ठल नारायण गावडे आणि रामा नाईक या गरीब कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. यात त्यांचे सुमारे साडेतीन लाखाचे नुकसान झाले आहे. चौकुळपासून आडयाष्टा ही वाडी सुमारे आठ ते दहा किमी अंतरावर आहे. तेथे जाताना सगळा जंगलमय
परिसर असल्याने या ठिकाणी
जाण्यास सहसा कोणी धजावत नाही. त्यामुळे येथे कोणतीही घटना घडली, तर ती समजण्यास उशीर होतो. मात्र, या ठिकाणी शासकीय यंत्रणा पोहोचली असून पशुवैद्यकीय अधिकारी व तलाठ्याने जाऊन तात्काळ पंचनामा केला. आपल्याला शासकीय मदत मिळावी, अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चौकुळ आडयाष्टा येथे विठ्ठल नारायण गावडे यांचे कुटुंब राहते. त्यांच्या शेजारी काही अंतरावर रामा नाईक यांचे कुटुंब राहते. या ठिकाणी पूर्वी लोकवस्ती होती. परंतु हे अंतर
चौकुळ गावापासून लांब असल्याने तेथे कोणत्याही सुविधा नसल्याने आणि जंगलमय भाग असल्याने तेथील कुटुंबांनी चौकुळ येथे स्थलांतर केले. परंतु विठ्ठल गावडे यांनी त्याच ठिकाणी शेती करून उदरनिर्वाह करायचे. जोडधंद्यासाठी त्यांनी म्हशी घेतल्या होत्या. एका म्हशीची किंमत ८० ते ९० हजार रुपये आहे. या दोन म्हशी दुभत्या होत्या. दुधावरच विठ्ठल यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालायचा. रामा नाईक यांचा रेडा आणि गुजर म्हैसही जळून गेली. गुरुवारी सायंकाळी विजेचा लोळ पडून म्हैस व रेडा जळून खाक झाला. यात दोन्ही कुटुंबांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
