मल्लसम्राट प्रतिष्ठान सामाजिक कार्यात इतिहास घडवेल!
*🛑मल्लसम्राट प्रतिष्ठान सामाजिक कार्यात इतिहास घडवेल!*
*🛑माजी नगराध्यक्ष संजू परब यांचा गौरवोद्गार.*
*🛑मल्ल सम्राटच्या जर्सीचे संजू परब यांच्या हस्ते अनावरण.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-१०:-* येथील मल्ल सम्राट प्रतिष्ठान नेहमीच सामाजिक विधायक उपक्रम राबवत असते. येत्या २० ऑक्टोबर रोजी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ‘मोफत आरोग्य शिबीर व मोफत औषधे वाटप’ कार्यक्रमाला माझ्या शुभेच्छा असून आगामी काळात मल्ल सम्राट प्रतिष्ठान सामाजिक कार्यात संपूर्ण कोकणात एक वेगळा इतिहास घडवेल, असे गौरवोद्गार सावंतवाडी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी काढले. श्री. परब यांच्या कार्यालयात मल्ल सम्राट प्रतिष्ठानच्या जर्सीचे अनावरण संजू परब यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी मल्ल सम्राट प्रतिष्ठानचे अध्यक्ष जावेद शेख, उपाध्यक्ष प्रा. रुपेश पाटील, सचिव पैलवान ललित हरमलकर, खजिनदार पैलवान गौरव कुडाळकर, पीआरओ साबाजी परब, पैलवान दादू हरमलकर, नेहा ढोले, आयान शेख, मृणाल शिरोडकर, पत्रकार विनायक गांवस, प्रसन्न गोंदावळे, समीर पालव यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान मलसम्राट प्रतिष्ठानच्या वतीने येत्या २० ऑक्टोबर रोजी कोलगाव येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या सभागृहात मोफत आरोग्य तपासणी शिबीर व मोफत औषधे वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून सावंतवाडी तालुक्यातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष जावेद शेख यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

