भुईबावडा घाट वाहतूक चार दिवसांत होणार पूर्ववत !
*🛑भुईबावडा घाट वाहतूक चार दिवसांत होणार पूर्ववत !*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वैभववाडी, दि-०८:-* खारेपाटण-गगनबावडा मार्गावरील भुईबावडा घाटात कोसळलेल्या मौरीची पाहणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विजयकुमार सर्वगौड यांनी केली. सदरचे काम युद्धपातळीवर पूर्ण करून वाहतूक सुरू करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी अधिकारी व ठेकेदारांना केल्या आहेत. भुईबावडा घाटात २६ सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टीमुळे घाटात अनेक ठिकाणी दरडी कोसळली होत्या. तसेच एक मोरीचा सिमेंट पाईप वाहून गेला होता. कोसळलेल्या दरडी हटवून रस्ता मोकळा करून घाटातून हलकी वाहतूक सुरू करण्यात आली होती. मात्र, मोरी कोसळल्यामुळे एसटी बससह अवजड वाहने गेले १२ दिवस वाहतूक बंद आहे. तर करुळ घाटही नूतनीकरणाच्या नावाखाली तब्बल नऊ महिने पूर्णपणे बंद आहे. सर्वगौड यांनी भुईबावडा घाटातील कोसळलेल्या मोरीसह संपूर्ण घाटाची पाहणी केली आहे. मोरीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचना त्यांनी अधिकारी व ठेकेदार यांना केली आहे. यावेळी उपभियंता विजय जोशी व अधिकारी उपस्थित होते.
भुईबावडा घाटात मोरीची संरक्षण भिंत दरीतून आठ मीटर उंच बांधण्यात येत असून सध्या तीन मीटर उंचीचे बांधकाम झाले आहे. येत्या चार-पाच दिवसात काम पूर्ण करून वाहतूक सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे जोशी यांनी सांगितले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

