करुळ घाटाच्या निकृष्ट कामाची सखोल चौकशी करा !
*🛑करुळ घाटाच्या निकृष्ट कामाची सखोल चौकशी करा !*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वैभववाडी, दि-०७:-* राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळालेल्या रस्त्यावरील कोकण व पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या करुळ घाटाच्या निकृष्ट कामाची उच्चस्तरीय सखोल चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (शरद पवार गट) शिवस्वराज्य यात्रेनिमित्त डॉ. कोल्हे सावंतवाडी येथे आले असता त्यांच्याशी तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील करुळ घाटाच्या निकृष्ट कामाची चर्चा केली. वैभववाडी तालुक्यातील तळेरे कोल्हापूर महामार्गावरील करुळ घाट रस्त्याचे बांधकाम जानेवारी २०२३ पासून सुरू करण्यात आले आहे. तेव्हापासून हा घाट मार्ग वाहतुकीस बंद आहे. या घाट रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे सुरू असून या कामाकडे प्रशासनासह राजकीय पदाधिकाऱ्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केला आहे. यावर्षी बांधकाम केलेल्या सहा ते सात संरक्षण भिंती पावसाळ्यात कोसळल्या आहेत तसेच काँक्रिट केलेला रस्ता ही वाहून गेला आहे तर त्यानंतरही सध्या सुरू असलेले काम हे निकृष्ट दर्जाचे सुरू आहे. या घाटमार्गातून दररोज सुमारे ३२ हजार मेट्रिक टन वाहतूक होते. या निकृष्ट कामाची चौकशी होऊन आपल्या स्तरावर प्रयत्न व्हावेत व घाटाचे काम चांगल्या दर्जाचे व्हावे, अशी मागणी चव्हाण यांनी निवेदनाद्वारे कोल्हे यांच्याकडे केली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_