कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

भाजपचे युवा मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष विशाल परब यांना पोलिस संरक्षण.

*भाजपचे युवा मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष विशाल परब यांना पोलिस संरक्षण*

*कोणतेही गुन्हेगारी रेकॉर्ड नसताना किंवा आक्रमक नेतृत्व नसताना विशाल परब यांना धोका कोणाचा*

सावंतवाडी –
भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांना पोलीस संरक्षण देण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने नुकताच घेतला आहे. विशाल परब यांच्यासारख्या कोणत्याच आक्रमक किंवा राडेबाजीच्या राजकारणात नसणाऱ्या शांत संयमी युवा नेतृत्वाला नेमका कोणापासून धोका आहे? त्यांना तातडीने पोलीस संरक्षण देण्याची आवश्यकता प्रशासनाला का वाटली असावी? कुठे चालले आहे सावंतवाडीचे राजकारण? कोण आहेत ज्यांच्यापासून विशाल परब यांच्या जीवीताला धोका आहे याबाबत पोलिसांकडे योग्य तो अहवाल असेलच. पण विशाल परब यांना पोलीस प्रशासनाने पुरवलेल्या संरक्षणानंतर जनमानसात मात्र चर्चांमधून अनेक प्रश्नचिन्हे उमटू लागली आहेत.
महात्मा गांधींनी सावंतवाडी संस्थानाला रामराज्य असे म्हटले होते. सावंतवाडीकर जनता ही शांतताप्रिय आणि लोकशाहीची बूज राखून आपले रोजचे व्यवहार करणारी जनता आहे. राजकारणातला दहशतवाद, दादागिरी किंवा राडेबाजी अशा प्रकारांना ही जनता कधीही थारा देत नाही. राजकारणाचा विचार केला तर दीपक केसरकर यांच्यासारखा आमदार मतदार संघाबाहेरील अन्य नेत्यांच्या दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करून आणि आपली शांतताप्रिय व्यक्तिमत्व ही छबी प्रस्थापित करून मागील तीन टर्म आमदार पदावर आहे.
पण या वेळचे बदललेले राजकारण सावंतवाडी मतदारसंघातील जनतेलाही अस्वस्थ करत आहे. या मतदारसंघातील अस्थिर राजकीय परिस्थिती, आमदार दीपक केसरकरांबाबत जनतेमध्ये असलेली प्रस्थापितांविरोधी लाट, महायुतीतील भाजपच्या नेत्यांनी दीपक केसरकरांवर त्यांनी वेळोवेळी दिलेल्या निष्फळ आश्वासनांबाबत आरोप, त्यांना दर्शवलेला उघड विरोध, हवेचा रुख ओळखून दीपक केसरकर आपले टोकाचे राजकीय हाडवैर असलेल्या नारायण राणेंशी साधलेली जवळीक,काल-परवापर्यंत ज्यांच्या दहशतवादाच्या मुद्द्यावर आपले राजकारण करत सावंतवाडीकर जनतेशी भावनिक संवाद साधला, त्याच नारायण राणे यांच्या दहशतवादावर मारलेला यु टर्न आणि मारलेली राजकीय प्रेमाची मिठी या सगळ्यातून सावंतवाडीचे समाजमन राजकारणाबाबत अस्वस्थ झाले आहे. तिकिटासाठी काहीही करणाऱ्या नेत्यांबद्दल जनतेच्या मनात उघड तिटकारा निर्माण झाला आहे.
यातूनच विशाल परबही सर्व ताकद वापरून मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत,त्यांना कोण रोखणार?ते निवडणूकीला उभे राहिलेत तर कोणाचा फायदा होणार?कोणाचे नुकसान होणार? याचीही गणिते मांडली जात आहे.विशाल परब यांच्या सहा रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्यानंणर बदलेले राजकारण,एकमेकांचे राजकीय जिवन उध्दवस्त करण्यासाठी चाललेली धडपड यातूनच हा संघर्ष उफाळून आला असावा असे बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!