आणखीकोकणमहाराष्ट्ररत्नागिरीराजकीय

🛑 साड्या वाटप करणारे कोरोना, चक्रिवादळांच्या काळात होते कुठे?

🛑 आ. भास्करराव जाधव यांचा सवाल, पुण्यात गुहागरवासियांचा मेळाव्याला मोठी गर्दी ?

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर

🎴चिपळूण , दि – ०३:- निवडणूक आल्यामुळे भाजपची मंडळी आज गावागावात जावून जावून महिलांना साड्या वाटप करत आहेत. परंतु, कोरोनाच्या संकटकाळात, त्याचबरोबर निसर्ग, तौक्ते यासारख्या चक्रिवादळाच्या काळात ही मंडळी होती कुठे, असा सवाल शिवसेना नेते, गुहागरचे आमदार श्री. भास्करराव जाधव यांनी गुहागर मतदारसंघातील पुणेकरांच्या मेळाव्यात काढले. माझी पत्नी २००७ पासून हळदी कुंकवाच्या निमित्ताने दरवर्षी गावोगावी जाते आणि हजारो महिलांपर्यंत वाण पोहोचवते, असे उद्गारही त्यांनी काढले.

पुणे येथे वास्तव्यास असलेल्या गुहागर मतदारसंघातील रहिवाशांचा मेळावा पुण्यातील चांदणी लाॅन्स येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. या मेळाव्याला गुहागर, खेड आणि चिपळूण तालुक्यातील हजारोंच्या संख्येने पुणेकर उपस्थित होते. कोरोनाच्या काळात लोकांना औषधे, धान्य पुरविण्यापासून मुंबई-पुण्याच्या चाकरमान्यांना गावात घेतलं पाहिजे यासाठी प्रबोधन करण्यापर्यंतचे काम आम्ही केले. वेगवेगळया चक्रिवादळांच्या काळात नुकसानग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याचे काम आम्ही केले. त्यावेळी सध्या साडीवाटप करणारी भाजपची मंडळी घरात बसलेली होती, अशी घणाघाती टीका आमदार श्री. जाधव यांनी केली. याच भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी गेल्या अडीच वर्षात विकासकामांना रूपयाचा दिला नाही, उलट आधीचे मुख्यमंत्री श्री. उध्दवसाहेब ठाकरे यांनी मंजूर केलेल्या विकासकामांवर स्थगिती आणली. आपण उच्च न्यायालयात संघर्ष करून ही स्थगिती उठवली, असे सांगताना त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेचा केवळ गवगवा आहे. राज्यात ६ कोटी ५३ लाख महिलांपैकी केवळ १ कोटी १३ लाख महिलांनाच या योजनेचा लाभ मिळाला आहे. उर्वरित ५ कोटी ४० लाख महिला या योजनेपासून वंचित आहेत, हे वास्तव समोर आणले.

 

या मेळाव्यात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री. विक्रांत जाधव यांनी आपल्या भाषणाने सर्वांचे मन जिंकले. विक्रांतचे भाषण ऐकून आपण मंत्रमुग्ध झालो, असे उद्गार मेळाव्याला उपस्थित माजी मंत्री श्री. शशिकांत सुतार यांनी काढले. आमदार श्री. जाधव यांनी मंत्रिपदाच्या काळात केलेले प्रचंड काम, विविध योजनांच्या माध्यमातून गरजूंना मिळवून दिलेला लाभ, संकटकाळात धावून जावून केलेली मदत याची आठवण करून देत विक्रांत जाधव यांनी १६ फेब्रुवारी २०२ रोजी शृंगारतळी येथील सभेत आमच्या कुटुंबावर झालेली अश्लील भाषेतील शिविगाळ तुम्हाला मान्य आहे का, असा सवाल उपस्थितांना केला. याचं उत्तर मतदानाच्या माध्यमातून तुम्हाला दयावं लागेल, असे सांगताना ते म्हणाले, आमदार जाधव साहेब हे जरूर आक्रमक आहेत. पण ते कधीही कुणाच्या मुलींविषयी, महिलांविषयी बोलत नाहीत आणि त्यांच्यावर गेल्या ३५ वर्षात भ्रष्टाचाराचा एकही डाग नाही.

 

शिवसेनेचे शहरप्रमुख श्री. गजानन थरपुडे, महानगरपालिकेतील माजी गटनेते श्री. पृथ्वीराज सुतार, गुहागर संपर्क प्रमुख श्री. प्रकाश महाडिक, निवृत्त जिल्हाधिकारी श्री. मधुसुदन साळवी, महिला संघटिका सविताताई मते, श्री. वैभव वाघ, जत तालुका संपर्कप्रमुख प्रेरणा तटकरे, गुहागरचे तालुकाप्रमुख सचिन बाईत, माजी सभापती विभावरी मुळे, तालुका सचिव महेश गोवळकर, नुरभाई दळवी आदी यावेळी व्यासपिठावर होते. श्री. विनायक मुळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा मेळावा यशस्वी केला.

 

 

*……….सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇*

 

 

 

*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

 

*🎥KOKAN LIVE BREAKING || ADVT*

 

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

 

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

 

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*

🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत

🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक

💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या

❄️ वातानुकूलित वर्गखोल्या

🚌 बस आणि वसतिगृहाची सोय

💻 संगणकीय प्रयोगशाळा

📙 ग्रंथालयाची सुविधा

🧪 सुसज्ज प्रयोगशाळा

⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद

🗒️ यशस्वी निकालाची परंपरा

▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग

⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन

🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा

🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश

👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

 

 

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

 

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

 

☎️ संपर्क :

9158788345

8788101853

9405238763

 

*👇🏻जाहिरात लिंक👇🏻*

ADVT || सिंधुदुर्ग ॲकॅडमी

________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!