सिंधुदुर्गात आजपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ १५८ ठिकाणी दुर्गामाता मूर्ती प्रतिष्ठापना
*🛑सिंधुदुर्गात आजपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ १५८ ठिकाणी दुर्गामाता मूर्ती प्रतिष्ठापना*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्गनगरी, दि-०३:-* सिंधुदुर्ग जिल्हयात ३ ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत असून या नवरात्रोत्सवात विविध सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांबरोबरच दांडिया रास व गरबा नृत्यावर तरुण, तरुणी थिरकताना दिसणार आहेत. जिल्हयात १५८ ठिकाणी दुर्गामाता मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. यामध्ये १२५ ठिकाणी सार्वजनिक, तर ३३ ठिकाणी खासगी ठिकाणी दुर्गामाता मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. दरम्यान विधानसभेची निवडणूक तोंडावरच आली असल्याने जिल्हयात कोणत्याही प्रकारची राजकीय गडबड होऊ नये, शांततेत नवरात्रोत्सव पार पाडावा, यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ३ ऑक्टोबरला घटस्थापनेपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ होणार आहे. सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळे तसेच विविध मंदिरे, खासगी घरांमध्ये दुर्गा प्रतिष्ठापना करण्याची परंपरा आहे. या नवरात्रोत्सवात मंदिरांमध्ये व दुर्गामाता प्रतिष्ठापनेच्या ठिकाणी भजने, फुगड्या, रासदांडिया नृत्य, रास क्रीडा, वेशभूषा असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन केले आहे. धार्मिक, सांस्कृतिक उपक्रमामुळे नवरात्रोत्सवानिमित्त आनंदी, उत्साहाचे वातावरण निर्माण होणार
जिल्हयात नवरात्रोत्सव सुरू होण्याबरोबरच आता विधानसभेच्या
निवडणुकाही तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे नवरात्रोत्सवामध्ये काही प्रमाणात निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने वातावरण निर्माण होणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल म्हणाले, प्रत्येक दुर्गामाता मूर्ती प्रतिष्ठापनेच्या ठिकाणी तसेच ज्या-ज्या ठिकाणी रास, गरबा, दांडिया खेळवल्या जाणार आहेत, त्याठिकाणी पोलीस व होमगार्डचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. त्याबाबत संबंधित स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन नवरात्रोत्सव कार्यक्रम शांततेत पार पाडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात ३ ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सवासाठी १२५ ठिकाणी सार्वत्रिक नवरात्रोत्सव मंडळांतर्फे दुगदिवी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. यामध्ये दोडामार्ग पोलीस ठाण्यांतर्गत ११ तसेच बांदा ८, सावंतवाडी १५, कुडाळ १४, वेंगुर्ला १०, निवती ५, सिंधुदुर्गनगरी ५, मालवण १५, आचरा ४, देवगड १०, विजयदुर्ग ६, कणकवली १३, वैभववाडी ९ आदी ठिकाणी दुर्गादिवी मूर्तीची प्रतिष्ठापना सार्वजनिकरित्या करण्यात येणार आहे. याशिवाय दोडामार्ग २, वेंगुर्ले ४, कुडाळ २, मालवण ९, विजयदुर्ग १, सिंधुदुर्गनगरी १, देवगड ८, सावंतवाडी ६ आदी ३३ दुर्गादेवी मूर्तीची खासगीरित्या प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. उत्सवाची सांगता विजयादशमीला होणार आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

