*48 गावांचा अधिपती श्री देव स्थापेश्वर मंदिराच्या सुशोभीकरणासाठी पर्यटन विकास योजनेतून तीन कोटी मंजूर*
*शेचाळीस गावांचा अधिपती श्री देव स्थापेश्वर मंदिराच्या सुशोभीकरणासाठी पर्यटन विकास योजनेतून तीन कोटी मंजूर*
46 गावांचा अधिपती व जागृत देवस्थान श्री देव देवस्थापेश्वर मंदिरा साठी पर्यटन विकास योजनेअंतर्गत मंदिराचे सुशोभीकरण व पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी तीन कोटी रुपये मंजूर केले आहेत, गावच्या प्रमुख मानकऱ्यांनी माजी आमदार राजन तेली यांनी दिलेला शब्द पूर्ण केल्याने राजन तेली व प्रशासनाचे आभार मानले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की डेगवे गावातील प्रमुख मानकऱ्यांनी माजी आमदार राजन तेली यांची भेट घेऊन पर्यटन विकास योजनेअंतर्गत स्थापेश्वर मंदिराच्या सुशोभीकरणासाठी व इतर पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मोठ्या स्वरूपात निधी मिळावा अशी मागणी केली होती ,राजन तेली यांनी डेगवे ग्रामस्थांना व मानकर यांना आपण त्याचा पाठपुरावा करून शंभर टक्के आपल्याला हा निधी मिळून देऊ असे आश्वासन दिले होते. पर्यटन मंत्री गिरीश महाजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यामुळे तीन कोटी रुपये डेगवे देवस्थापेश्वर मंदिराला प्राप्त झाल्याचे पत्र शासनाकडून मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी माजी आमदार राजन तेली मंत्री गिरीश महाजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत .
गेली अनेक वर्षे या मंदिराला निधी मिळावा यासाठी हे गावकर मंडळी वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करत होते, मात्र या मानकरी मंडळींनी ज्यावेळी माजी आमदार राजन तेजी यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी स्वतः डेगवे गावामध्ये जाऊन ग्रामस्थांशी चर्चा केली व मंदिरासाठी ज्या पायाभूत सुविधा उपलब्ध व्हायला हव्यात त्यासाठी सुमारे तीन कोटी रुपये खर्च असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले ,त्यावर राजन तेली यांनी आचारसंहितेपूर्वी आपल्याला हा निधी मिळवून देऊ असे आश्वासन ग्रामस्थांना दिले होते.
आज मंदिराला तीन कोटी रुपये प्राप्त झाल्याचे पत्र ग्रामस्थांना मिळाल्यावर माजी आमदार राजन तेली यांनी मंत्री गिरीश महाजन पालकमंत्री रविंद्र चव्हाण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत तर ग्रामस्थांनी राजन तेली यांनी दिलेला शब्द पूर्ण केल्याबद्दल राजन तेली यांचे आभार व्यक्त केले आहेत.
-मधुकर मोहन देसाई,प्रविण बाबाजी देसाई,उत्तम बाळा देसाई,राजन सहदेव देसाई,मधुकर उमाजी देसाई,प्रेमानंद देसाई,सिताराम अर्जुन देसाई,सुर्याजी गंगाराम देसाई,भरत सदाशिव देसाई,दादा भालचंद्र देसाई,दशरथ अमृत देसाई,अजित नारायण देसाई,शामसुंदर महादेव देसाई व समस्थ ग्रामस्थ