कोकणमहाराष्ट्रमालवण

एसटी महामंडळाचा आंगणेवाडीवर अन्याय !

*🛑एसटी महामंडळाचा आंगणेवाडीवर अन्याय !*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴मसुरे, दि-०२:-* पालकमंत्री रवींद्र चव्हाण तसेच तत्कालीन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या आदेशानंतर विभाग नियंत्रक अभिजीत पाटील यांनी देवगड-आंगणेवाडी-मालवण व्हाया आचरा-त्रिंबक-मसुरे-बांदिवडे- आंगणेवाडी-मालवण ही एसटी बस सुरू केली. परंतु देवगड एसटी डेपो मॅनेजरनी ही बस काही दिवसांतच पुन्हा बंद केली. परंतु पुन्हा एकदा आंगणेवाडी विकास मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी लेखी निवेदन व. भेट घेऊन ही एसटी पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले असता, ही बस विजयदुर्ग-आंगणेवाडी अशी सुरू केली परंतु सद्यस्थितीत ही बस कधी येते, कधी येत नाही हे कोणालाच कळत नाही. काही वेळेला ही एसटी दुसऱ्याच मार्गाने जाते. त्यामुळे प्रवासी, ग्रामस्थ, आंगणेवाडी येथील भराडी देवीच्या भाविकांची गैरसोय होत आहे. काहीवेळा ही एसटी नियोजित बस थांब्यावरही थांबत नाही.
आंगणेवाडी येथील भराडी देवीच्या प्रसिद्ध मंदिराला रोज हजारो भाविक भेट देत असतात. म्हणूनच या एसटीची मागणी भराडी मातेच्या भक्त व ग्रामस्थांकडून होत होती. येथील प्रसिद्ध यात्रोत्सवात एसटी महामंडळाला ग्रामस्थ व मंडळ जागा विनामोबदला उपलब्ध करून नेहमी सहकार्य करत असतात. परंतु देवगड एसटी आगार आणि संबंधित सर्व एसटी अधिकारी वर्गाच्या गलथान कारभारामुळे ही बस अनियमित तर कधी-कधी येतच नसल्यामुळे आंगणेवाडीवर हा अन्याय आहे. एसटी कायमस्वरुपी सुरू न केल्यास येथील ग्रामस्थ आंदोलन छेडणार असून याबाबत पुन्हा एकदा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे लक्ष वेधणार आहोत, अशी माहिती आंगणेवाडी येथील ग्रामस्थ बाळा आंगणे यांनी दिली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!