महाराष्ट्रसावंतवाडी

मळगाव येथील आरोग्य शिबीरात १५० रुग्णांची मोफत तपासणी व औषधोपचार.

*🛑मळगाव येथील आरोग्य शिबीरात १५० रुग्णांची मोफत तपासणी व औषधोपचार.*

*🛑भाजप व एसएसपीएम मेडिकल कॉलेज अँड लाईफटाईम हॉस्पिटल पडवे यांचे आयोजन*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :नितिन गावडे*

*🎴सावंतवाडी, दि-०१:-* भारतीय जनता पार्टी मळगांव व एसएसपीएम मेडिकल कॉलेज अँड लाईफटाईम हॉस्पिटल, पडवे यांच्या संयुक्त विद्यमाने मळगांव येथील पेडणेकर सभागृह येथे आयोजित महाआरोग्य शिबिराला रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सुमारे १५० हून अधिक रुग्णांची मोफत तपासणी तसेच मोफत औषधांचे वाटप यावेळी करण्यात आले.
आरोग्य शिबिराचे उद्घाटन सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती राजू परब यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी मळगाव सरपंच हनुमंत पेडणेकर, माजी सरपंच निलेश कुडव, माजी सरपंच गणेशप्रसाद पेडणेकर, माजी सरपंच स्नेहल जामदार, भाजप शक्ती केंद्रप्रमुख निळकंठ बुगडे, एस एस पी एम रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश घोगळे, डॉ. योगेश केंद्रे, डॉ. संजय जोशी, डॉ. निलेश म्हेत्रे, लॅब असिस्टंट अमित लिंगवत, भाजपचे बुथ अध्यक्ष भगवान रेडकर, एकनाथ गावडे, एकनाथ खडपकर, रुपेश सावंत, सुखदेव राऊळ, प्रा. गणपत शिरोडकर , निलेश राऊळ, ग्रामपंचायत सदस्य निकिता राऊळ, प्रकाश जाधव, अनिषा जाधव आदी उपस्थित होते.
या शिबिरामध्ये मोफत हृदयरोग तपासणी, कर्करोग तपासणी, नेफ्रोलॉजि तपासणी ,
दंतरोग तपासणी , नेत्ररोग तपासणी , अस्थिरोग तपासणी , स्त्रीरोग तपासणी
तसेच लघवी तपासणी ,
रक्त तपासणी ,
थायरॉईड तपासणी , शुगर तपासणी ‘ इसीजी
तसेच कर्करोग चाचणी करण्यात आली.
दरम्यान, नेत्र तपासणी केलेल्या रुग्णांसाठी तसेच अन्य नेत्र तपासणी इच्छुक असलेल्या रुग्णांसाठी रविवार ६ ऑक्टोबर रोजी याच ठिकाणी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यावेळी नेत्र तपासणीनंतर अत्यल्प दरात चष्म्याचे वाटप करण्यात येणार आहे. सावंतवाडीतील शुभांगी ऑप्टिक्सच्या सौजन्याने या शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी माजी सभापती राजू परब तसेच सरपंच हनुमंत पेडणेकर यांनी दिली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!