कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

न्यू इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय कसाल येथे विद्यार्थी परिषदेचा पदग्रहण सोहळा संपन्न..

*🛑 न्यू इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय कसाल येथे विद्यार्थी परिषदेचा पदग्रहण सोहळा संपन्न..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :सुनील आचरेकर*

*🎴सिंधुदुर्ग, दि-२८:-* न्यू इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय कसाल येथे आज दि.२७ सप्टेंबर २०२४ रोजी विद्यार्थी परिषदेचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला. विद्यार्थ्यांची विविध क्षेत्रांमधील कला,कौशल्ये विकसित होऊन एक पोषक व निकोप स्पर्धा निर्माण व्हावी या हेतूस्तव प्रशालेने संकुलव्यवस्था निर्माण केली आहे. सिंहगड, प्रतापगड, रायगड, रांगणागड अशी गडांची नावे देऊन त्यात इयत्ता ५ वी ते १२ वी मधील विद्यार्थी सहभागी केले आहेत. आज याच संकुलाच्या व शालेय मंत्रिमंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला त्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे चेअरमन आनंद उर्फ भाई सावंत, सन्मानिय अतिथी म्हणून सचिव यशवंत परब, विश्वस्त अवधूत मालणकर,शाळा समिती अध्यक्ष नवीन बांदेकर,सदस्य विवेकानंद बालम तसेच मुख्याध्यापक मळगांवकर सर व पर्यवेक्षिका बालम मॅडम इत्यादी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत कदम सर यांच्या सूत्रसंचालनाखाली अत्यंत शिस्तबद्ध आणि सुबकरित्या कार्यक्रमाला संपन्नता प्राप्त झाली सर्वप्रथम प्रशालेचे मुख्याध्यापक मळगांवकर सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तत्पश्चात शालेय मंत्रिमंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे मान्यवरांच्या हस्ते पदग्रहण झाल्यानंतर संकुलाच्या प्रमुखांचे पदग्रहण पूर्ण झाले.तद्नंतर मान्यवरांची मनोगते संपन्न झाली.ज्येष्ठ शिक्षक,शाळा समिती सदस्य कानंद बालम सर यांनी विद्यार्थ्यांना ‘हा पदग्रहण सोहळा म्हणजे आपल्यासाठी वारीमधील वारकऱ्याच्या शिदोरीप्रमाणे आहे. ज्याप्रमाणे ती शिदोरी घेतल्यानंतर नव्या ऊर्जेने,नव्या जोमाने सुसज्ज होऊन तो वारकरी आपले ध्येय गाठतो,त्याप्रमाणे आपण सर्वांनी या सोहळ्यानंतर आपापले निश्चित ध्येय प्राप्त करण्यासाठी सुसज्ज झाले पाहिजे! तसेच सर्वांनी मिळून व्यक्तिशः इर्षा मनात न ठेवता फक्त स्पर्धात्मक भावनेने वागून एक निकोप स्पर्धा निर्माण करूया.’ असा बहुमोल, मार्गदर्शनात्मक संदेश देत आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या.सचिव यशवंत परब आणि विश्वस्त अवधूत मालणकर यांनी या उपक्रमाची संकल्पना पुढे आणणाऱ्या शिक्षकांचे सुरज चक्रवर्ती आणि सर्वच कर्मचाऱ्यांचे कौतुक करीत सर्वांना शुभेच्छा दिल्या.सरतेशेवटी कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे चेअरमन आनंद उर्फ भाई सावंत यांनी शुभेच्छा व्यक्त करीत काही नियत कालावधीमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी योगाचे काही प्रकार शिकून घेऊन ते सादर करावेत असे आवाहन विद्यार्थ्यांसमोर ठेवले.कार्यक्रमाच्या अंती पर्यवेक्षिका बालम मॅडम यांनी सर्व अतिथी व उपस्थितांचे प्रशालेतर्फे मनपूर्वक आभार मानत अध्यक्षीय परवानगीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आला.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!