🛑 कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहणार
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴पुणे , दि – २५:- नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) परतीची वाटचाल सुरू असतानाच राज्यात परतीचा पाऊस सक्रिय झाला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. २५) पावसाचा जोर कायम राहणार असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. पुणे आणि रायगड जिल्ह्यात अतिदक्षतेचा इशारा (रेड अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.विदर्भात उन्हाचा चटका कायम असून, पावसाची उघडीप असलेल्या भागात कमाल तापमानातील वाढ कायम आहे. मंगळवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये गोंदिया येथे राज्यातील उच्चांकी ३५.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उन्हाचा चटका उकाडा कायम असतानाच, दुपारनंतर जोरदार वादळी वारे, विजांसह वळीव स्वरूपाचा पावसाने हजेरी लावली आहे.आज (ता. २५) राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असून, कोकणातील रायगड आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिजोरदार पावसाचा अंदाज असल्याने अतिदक्षतेचा इशारा (रेड अलर्ट) देण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नगर, वर्धा जिल्ह्यांत जोरदार पावसामुळे दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
मॉन्सूनची परतीची वाटचाल सुरूच
परतीचा प्रवास सुरूच असल्याने मंगळवारी (ता. २४) राजस्थान आणि गुजरातच्या आणखी काही भागासह पंजाब आणि हरियानाच्या काही भागातून मॉन्सून परतला आहे. फिरोजपूर, सिरसा, चुरू, अजमेर, माऊंट आबू, दीसा, सुरेंद्रनगर ते जुनागडपर्यंत मॉन्सूनची परतीची सीमा आहे. उत्तर आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे.
बुधवारी (ता. २५) राज्यातील पावसाचा अंदाज दर्शविणारा नकाशा. (स्रोत : हवामान विभाग)
मुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) :
रायगड,पुणे.
*अतिजोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :*
पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नगर, वर्धा.
*जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :*
नंदुरबार, धुळे, जळगाव, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, गडचिरोली.
*विजांसह वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :*
धाराशिव, लातूर, नांदेड, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

