🛑 अक्षय शिंदे यांनी गोळीबार केला.. आणि पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴मुंबई , दि – २३:- बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी (23 सप्टेंबर) पोलीस चकमकीत मृत्यू झाला. या चकमकीत एका पोलिसालाही गोळी लागली. जखमी पोलीस कर्मचाऱ्याल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अहवालानुसार, शिंदे याला पोलीस कोठडीत घेत असताना त्याने गोळीबार केला आणि पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला. अक्षय शिंदेला दुसऱ्या एका गुन्ह्यात अटक केल्यानंतर तळोजा कारागृहातून नेत असताना, त्याने कारमधील पोलिसाची बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळीबार केला. यावेळी शिंदेने एकूण तीन गोळ्या झाडल्या. एक गोळी एका पोलिसाला लागली, दोन गोळ्या कोणालाही लागल्या नाहीत. यानंतर दुसऱ्या एका पोलिसाने स्वसंरक्षणार्थ बंदूक काढून अक्षय शिंदेवर गोळीबार केला, त्यात त्याचा मृत्यू झाला.
ऑगस्ट महिन्यात अक्षय शिंदेला दोन अल्पवयीन मुलींच्या लैंगिक छळ प्रकरणी ताब्यात घेण्यात आले होते. 17 ऑगस्ट रोजी अक्षय शिंदेला लैंगिक छळाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. या संपूर्ण प्रकरणाचा तपास एसआयटी करत आहे. बदलापूर येथील शाळेत बलात्काराशिवाय अक्षय शिंदे याच्यावर बलात्काराचे आणखी दोन गुन्हे दाखल आहेत. या संदर्भात पोलिसांनी न्यायालयाकडून त्याची कोठडी मिळवली होती. त्याला कारागृहातून परत पोलीस कोठडीत नेत असताना ही घटना घडली.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

