कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

वृक्षतोडीच्या अन्यायकारक दंडातून सिंधुदुर्गला वगळा, अन्यथा आंदोलन – मंगेश तळवणेकर

*🛑वृक्षतोडीच्या अन्यायकारक दंडातून सिंधुदुर्गला वगळा, अन्यथा आंदोलन – मंगेश तळवणेकर*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴ओटवणे, दि-२३:-* विनापरवाना वृक्षतोड करणाऱ्यांसाठी सरकारने ५० हजार रुपयांचा निश्चित केलेला दंड अ- न्यायकारक असून या शासन नि- र्णयाचा सिंधुदुर्ग जिल्ह्यावर विपरित परिणाम होणार आहे. जिल्ह्यात शेतकऱ्यांचा शेतीसह झाडांवरच उदरनिर्वाह अवलंबून असून त्यासाठी वर्षाकाठी झाडांची लागवड केली जाते. त्यामुळे या शासन निर्णयातून सिंधुदुर्ग जि- ल्ह्याला वगळण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक महसूल कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा आणण्याचा इशारा विठ्ठल-रखुमाई शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश तळवणेकर यांनी दिला आहे. विनापरवाना वृक्षतोड ५० हजाराचा दंड महाराष्ट्रात सर्वत्र सरसकट लावल्याने सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांना याचा सर्वात मोठा फटका बसणार आहे. कारण जिल्ह्यात ९० टक्के शेतकरी व १० टक्के लाकूड व्यावसायिक आहेत. त्यांच्या पूर्वजांनी वेगवेगळी झाडे लावलेली आहेत. कारणआपल्या अडचणींना ती झाडे विक्री करून आपला उदरनिर्वाह करतात. परंतु एका झाडाला ५० हजार रुपयांचा दंड लादल्याने शेतकरी व लाकूड व्यावसायिकांवर मोठे संकट ओढवले आहे. शासनाने या वृक्षतोड दंड निर्णयाचा फेरविचार करावा. कारण राज्याच्या तुलनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाडे ४ ते ५ वर्षांत पुन्हा वाढतात. जिल्हयाचे एकण क्षेत्रफळ ५०.८७.५० चौ. कि. मी. असून त्यापैकी १०.९२ टक्के वनविभागाचे क्षेत्र आहे. त्यामुळे झाडतोडीस परवानगी दिल्यास सिंधुदुर्गात कोणतीही अडचण होणारी नाही. पर्यायाने शासनाने सिंधुदुर्गचा विशेष बाब म्हणून विचार करून वृक्षतोड दंड निर्णयामधून वगळावे. अन्यथा येणाऱ्या विधानसभा व इतर सर्वच स्थानिक निवडणुकीवर या निर्णयाचा रोष शेतकरी दाखवून देणार आहेत. त्यामुळे या अन्यायकारक वृक्षतोड दंडाच्या निर्णयातून सिंधुदुर्ग जिल्ह्याला वगळावे, अशी मागणी तळवणेकर यांनी केली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!