आणखीकोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 ६ हजार झाडे तोडल्यानंतर फक्त २० लाख रुपये दंड केला या मागचे नेमके कारण काय ?

संदेश पारकर यांचा वन विभागाला सवाल

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि – १९: – सासोली-दोडामार्ग येथे तब्बल सहा हजाराहून अधिक झाडांची तोड करणाऱ्या संबंधितांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात यावेत, अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही. या विरोधात न्यायालयात जावू, असा इशारा ठाकरे शिवसेनेचे नेते संदेश पारकर यांनी आज वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला.

दरम्यान ६ हजार झाडे तोडल्यानंतर फक्त २० लाख रुपये दंड केला जातो. त्यामुळे या प्रकाराच्या मागे नेमके आहेत इतकी झाडे तोडेपर्यंत वन विभाग होता कुठे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. याबाबत काही झाले तरी आम्ही ग्रामस्थांच्या माध्यमातून आवाज उठवू, असा इशारा त्यांनी दिला आहे.

सासोली- दोडामार्ग येथे एका कंपनीच्या माध्यमातून तब्बल ६ हजार झाडांची कत्तल करण्यात आली आहे. हा सर्व प्रकार वनविभाग व महसूल यंत्रणेच्या समोर दिवसा ढवळ्या झाला आहे. इतकी झाडे तोडून सुद्धा संबंधितावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे या प्रकाराच्या विरोधात ठाकरे शिवसेनेचे नेते संदेश पारकर आक्रमक झाले. आज त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत वनविभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी माजी शहरप्रमुख शब्बीर मणियार, शहर प्रमुख शैलेश गवंडळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे यांना जाब विचारला. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडांची तोड करण्यात आली आहे. असे असताना वन विभाग नेमका गप्प का राहिला? एरव्ही एखाद्याने घर बांधण्यासाठी, लग्नासाठी किंवा अन्य घरगुती कारणासाठी एखादे झाड तोडल्यानंतर कारवाई करणारा अधिकारी या प्रकरणात गप्प का? असा सवाल करीत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात

यावी, तसेच संबंधितांवर थेट गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी यावेळी श्री. पारकर यांनी केली. तसेच हा भाग “इको सेन्सिटिव्ह झोन” मध्ये असल्यामुळे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया लवकरात- लवकर करण्यात यावी, अशी त्यांनी मागणी केली. दरम्यान यावेळी श्री. बोराटे यांनी आमची चौकशी सुरू आहे. सोडलेल्या झाडांचा पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. संबंधित माहिती मिळाल्यानंतर योग्य ती पुढील कारवाई करू, असे आश्वासन बोराटे यांनी दिले. त्यानंतर श्री. पारकर यांनी महसूल व भूमी अभिलेख अधिकाऱ्यांची भेट घेऊन या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!