कोकणदेवगडमहाराष्ट्र

कातकरी समाजातील अल्पवयीन मुलीची आत्महत्या

*🛑कातकरी समाजातील अल्पवयीन मुलीची आत्महत्या*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴देवगड, दि-१९:-* तालुक्यातील पालये येथे वास्तव्यास असणाऱ्या कातकरी समाजातील सानिका प्रकाश पवार (१२) या मुलीने राहत्या शेतमांगरातील लोखंडी बाराला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना बुधवारी दुपारी दीड वा. च्या सुमारास उघडकीस आली. तिच्या सानिका आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकलेले नाही. या घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत देवगड पोलीस स्थानकात सुरू होती. मिळालेल्या माहितीनुसार, मोंड निकमवाडी येथील प्रकाश पवार व त्यांचे कुटुंब गेली दोन वर्षे पालये येथील गोकुळ आंबेरकर यांच्या बागेत मोलमजुरीचे काम करीत आहे. आंबेरकर यांच्या बागेतच असणाऱ्या चिरेबंदी शेतमांगरामध्ये पवार कुटुंब राहत होते. बुधवारी सकाळच्या सुमारास नेहमीप्रमाणे प्रकाश पवार, त्यांची पत्नी हे बागेत कामाला गेले. दुपारी दीड वा. च्या सुमारास जेवणासाठी ते पुन्हा शेतमांगराकडे आले असता सानिका ही लोखंडी बाराला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावलेल्या स्थितीत दिसली. त्यांनी पवार घटनेची माहिती बागमालक आंबेरकर यांच्यामार्फत देवगड पोलिसांना दिली. त्यानंतर देवगडचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, हवालदार आशिष कदम, होमगार्ड समुपदेशक मंगेश जाधव यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. मृतदेह विच्छेदनासाठी देवगड ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. पुढील कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!