कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

त्वरित त्या मुलांचे वेतन द्या अन्यथा तीव्र आंदोलन करु

*🛑त्वरित त्या मुलांचे वेतन द्या अन्यथा तीव्र आंदोलन करु*

*🛑वेळ पडल्यास कार्यालय देखील फोडू ; मनसे जिल्हाध्यक्ष ॲड अनिल केसरकर यांचा इशारा*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :प्रशांत मोरजकर*

*🎴सावंतवाडी, दि-१८:-* येथील एका नामांकित कंपनीकडून कामावर असलेले युवक व युवती यांचे तब्बल तीन ते चार महिन्यांचे वेतन देण्यात आलेले नाही. तसेच काही कर्मचाऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता तडकाफडकी कामावरून काढून टाकण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर काही कर्मचाऱ्यांचा पीएफ ही अदा करण्यात आलेला नाही. शिवाय कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले काही धनादेश बाउन्स झालेले आहेत. त्यामुळे सदर कंपनीने या 210 कर्मचाऱ्यांचे वेतन आणि पीएफ पुढील सात दिवसात न दिल्यास कंपनीच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, किंबहुना कार्यालय देखील फोडण्यात येईल, असा जोरदार इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी दिला आहे. आज अन्याय झालेल्या सदर कर्मचाऱ्यांनी मनसेचे जिल्हाध्यक्ष केसरकर यांची भेट घेऊन आपले म्हणणे सादर केले .
सदर कर्मचार्‍यांसमवेत केसरकर यांनी सावंतवाडी येथील पर्णकुटी विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली. यावेळी मनसेचे शहराध्यक्ष ॲड. राजू कासकर, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष केतन सावंत, राहुल जांबरे, तसेच सदर कंपनीत अन्याय झालेले कर्मचारी निखिल सावंत, समीर लाड, मंगेश चांदवडकर, अनिकेत बोभाटे, मोहम्मद सलमान खान, अंकिता उपरकर, दिशा हर्डीकर, उजमा बेग, गौरी मेस्त्री, खादीजा रेडकर, मंजिरी उपरकर, प्रतीक्षा गावडे, अक्षता इंगळे, तन्वी राणे, मनीषा निगुडकर, धीरज तुळसकर यांसह अनेक कर्मचारी युवक – युवती उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!