आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 सहकार भारतीचे महाराष्ट्र प्रदेश त्रैवार्षिक अधिवेशन शिर्डी येथे..

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

🎴सिंधुदुर्ग ,दि -१५:– सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशाचे चौदावे त्रैवार्षिक अधिवेशन शनिवार दि. २१ सप्टेंबर व रविवार दि. २२ सप्टेंबर २०१४ रोजी साई पालखी निवारा, शिर्डी येथे आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातील ३६ जिल्हे व ३०० तालुक्यांमधून सुमारे १७०० च्या वर सहकार भारतीचे क्रियाशील कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती सहकार भारतीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा डॉ. शशीताई अहिरे व महामंत्री विवेक जुगादे यांनी दिली.
या अधिवेशनाचे उ‌द्घाटक या नात्याने केंद्रीय सहकार राज्यमंत्री मा. श्री. मुरलीधर मोहोळ उपस्थित राहणार असून प्रमुख अतिथी या नात्याने महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री मा. श्री. दिलीप वळसे पाटील, सहकार आयुक्त व निबंधक मा. श्री. दिपक तावरे तसेच भारतीय रिजर्व्ह बँकेचे संचालक मा. श्री. सतीशजी मराठे उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. राधाकृष्ण विखे पाटील हे अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष असणार आहे. यासोबतच सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. दिनानाथजी ठाकुर, राष्ट्रीय महामंत्री मा. डॉ. श्री. उदयजी जोशी, राष्ट्रीय संघटनमंत्री, मा. श्री. संजयजी पाचपोर अधिवेशनास पूर्ण वेळ उपस्थित राहून मार्गदर्शन करणार असल्याचे विवेक जुगादे यांनी सांगितले.
या अधिवेशनाचे उ‌द्घाटन २१ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता होणार असून अधिवेशनाचा समारोप दि. २२ सप्टेंबर रोजी दुपारी २.०० वाजता होणार आहे. सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने प्रत्येक वर्षी होणाऱ्या त्रैवार्षिक अधिवेशनामध्ये सहकार भारतीचे संस्थापक अध्यक्ष कै. अण्णासाहेब गोडबोले यांच्या नावाने सहकार क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या व्यक्तीला पुरस्कार दिला जातो. यंदाच्या शिर्डी येथे होणाऱ्या सहकार भारतीच्या चौदाव्या त्रैवार्षिक अधिवेशनामध्ये हा मानाचा पुरस्कार सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांना जाहीर झाला आहे. शनिवार दि. २१ सप्टेंबर २०१४ रोजी सायं. ६.०० वाजता शिर्डी येथील अधिवेशनस्थळी राजस्थानचे राज्यपाल मा. श्री. हरिभाऊ बागडे यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. महाराष्ट्रातील सहकार भारतीचे हजारो सक्रीय कार्यकर्ते या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होणार आहे.
या अधिवेशनामध्ये कार्यकर्त्यांसाठी विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले असून सहकार क्षेत्राशी निगडीत अनेक प्रस्तावदेखील पारीत करण्यात येणार आहे. येणाऱ्या काळात सहकार क्षेत्राची दिशा कशी असेल याबाबतही या अधिवेशनात मंथन केले जाणार आहे. यासोबतच महाराष्ट्र प्रदेशाची पुढील ३ वर्षासाठीची नवीन कार्यकारिणीदेखील अधिवेशनात निवडली जाणार असल्याचे विवेक जुगादे यांनी सांगितले. सहकारात काही चांगले घडावे व नैतिकतेच्या तसेच सामाजिक जाणीवेच्या पायावरच ही चळवळ उभी रहावी असे मनापासून वाटणाऱ्या काही प्रमुख मंडळीनी १९७८ मध्ये एकत्र येऊन ‘सहकार भारती’ या स्वयंसेवी संघटनेची स्थापना केली. गेली ४६ वर्षे या संघटनेचे कार्य अविरतपणे सुरू आहे. त्यामुळेच आज सहकारी चळवळीला योग्य दिशा मिळण्याचे सुचिन्ह दिसू लागले आहे. ‘बिना
सहकार-नही उद्धार’ हे सहकार चळवळीचे ध्येयवाक्य सर्वश्रुत आहे. पण सहकार हा खऱ्या अर्थाने यशस्वी व कार्यान्वित व्हावयाचा
असेल तर त्यातील काम करणारे लहानथोर सर्वच कार्यकर्ते हे समाजसेवी वृत्तीचे असले पाहीजेत. म्हणून सहकार भारतीने ‘बिना सहकार नाही उद्धार’ या ध्येयवाक्याला ‘बिना संस्कार नही सहकार’ अशी अर्थपूर्ण जोड दिली आणि या दोन वाक्यातूनच आपल्या कार्याची दिशा स्पष्ट केली.
आज संपूर्ण देशभरातील ७०० हून अधिक जिल्ह्यांमध्ये सहकार भारतीचे कार्य अत्यंत प्रभावीपणे सुरू असून हजारो कार्यकर्त्यांच्या
माध्यमातून लाखो लोकं सहकार भारतीशी जोडल्या गेली आहेत. सहकार भारतीच्या विशेष प्रयत्नांमुळेच सहकाराचे स्वतंत्र मंत्रालय आजकेंद्रात स्थापन झाले आहे. सर्व प्रकारच्या सहकारी संस्था व बँकांचे प्रश्न नियमीतपणे सहकार भारतीच्या माध्यमातून सोडविले जात आहेत. सहकार भारतीचे कार्य आज महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये तसेच तालुक्यांमध्ये पसरलेले आहे. प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी आपल्या जिल्ह्याची परिस्थिती व विशिष्ट कामाची गरज लक्षात घेऊन प्रशिक्षण वर्ग, अभ्यास वर्ग, संस्थांचे मेळावे, संचालक व कर्मचाऱ्यांचे अभ्यासवर्ग, चर्चासत्रे, विविध संस्थांच्या प्रश्नावर परिसंवाद इत्यादीद्वारे उपक्रम चालू ठेवले आहेत. नवीन संस्थांची स्थापना व त्यासाठी विविध स्तरांवरील अधिकारी मंडळीशी संपर्क ठेवण्याचे कामही सहकार भारतीने केले आहे. या अधिवेशनाचे प्रदेश अधिवेशन प्रमुख ॲड रविकाका बोरावके व अधिवेशन सहप्रमुख श्री. अभिनाथ शिंदे राहणार आहेत.

*…………… सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा……..👇👇*

——————————————–

*⚡कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🚰मे श्रीराम बोअरवेल🚰*
_१००% पाण्याची गॅरंटी_

▪️श्रीराम बोअरवेल्स सिंगल फेज व थ्री फेज सबमर्सिबल पंपसेट योग्य दरात फिटींग करुन मिळेल
_____________________
*🚰बोअरवेल नियम व अटी याप्रमाणे राहतील.🚿*
🚒🚒🚒🚒🚒🚒🚒🚒🚒
▪️सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आमच्याकडे अडचणी ठिकाणी ३०० फुट लांब गाडी बाहेर उभी करुन, मोठे होल ६” (इंच)
बोअरवेल ५०० फुटापर्यंत खुदाई करुन मिळेल.
▪️आम्ही इलेक्ट्रॉनिक मशिनने सर्व्हे केलेल्या बोअरवेल पॉईंटला जागेनुसार पर डे (प्रत्येक दिवशी) कमीत कमी ५००० लीटर ते १०००० लीटर पाण्याची १००% हमी दिली जाते. ▪️आमचेकडून बोअरवेलसाठी पाणी सर्व्हे व बोअरवेल मारून घेतल्यास बोअरवेलला पाणी न मिळाल्यास नियम व अटीनुसार १००% रक्कम १०० दिवसांनी परत दिली जाईल. बोअरवेल पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण पेमेंट भरून घेतले जाईल तत्पूर्वी आमच्या अॅग्रीमेन्ट पेपरवरती आपली सही घेतलीजाईल.
▪️बोअरवेलचे पाणी सर्व्हे करतेवेळी अॅडव्हान्स (डिपॉझिट) म्हणून रु.६०,०००/- व ड्राय एरीया (कमी पाण्याचा भाग) असेल तर रु.७०,०००/- पर्यंत अॅडव्हान्स रक्कम जागेवरती भरुन घेतली जाईल. त्यानंतर पाणी पॉईंट सर्व्हे केला जाईल, (गोवा एरियामध्ये बोअरवेल अॅडव्हान्स १ लाख रुपये भरुन घेतले जाईल.)
▪️आमचेकडे 3D जर्मन इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी मशिनद्वारे १५०० फूटापर्यंत बोअरवेल व विहीरीचा पॉईंट सर्व्हे करुन दिला जातो.
▪️बोअरवेल खुदाई व पंपसेट दोन्ही आमच्याकडून करून घेतल्यास संपूर्ण २ वर्षे पाण्याची गॅरंटी दिली जाईल व २ वर्षात
बोअरवेलला पाणी कमी झाल्यास संपूर्ण पेमेंट परत दिले जाईल किंवा त्याबदल्यात मोफत दुसरी नवीन बोअरवेल खुदाई
करून मिळेल ही ग्राहकांनी नोंद घ्यावी. ▪️आमचेकडे 1 HP ते 20 HP पर्यंत थ्रीफेज सोलर पंपसेट फायनान्ससह १ वर्षाच्या मुदतीसह फिटींग करुन देऊ. (नियम वअटी लागू) कमीत कमी डाऊन पेमेंट ३०% असेल.

*🚰फायदे*👉- १० वर्ष लाईट बिलाची चिंता नाही, लोडशेडींगची भिती नाही, व्होल्टेजचा कोणताही प्रॉब्लेम नाही, सोलर पॅनेलला १० वर्षांची गॅरंटी व पंपसेटला दोन वर्षांची गॅरंटी.
▪️आमचेकडे पंपसेटला २ वर्षे गॅरंटी दिली जाते व १ वर्ष संपूर्ण फ्री सर्व्हिस दिली जाते. १ वर्षानंतर सर्व्हिस चार्ज घेतला जातो.
▪️तसेच पंपसेट २ वर्षापर्यंत खराब झालेस दुसरा नवीन पंपसेट पहिल्या गॅरंटीमध्ये फिटींग करुन दिला जातो व फक्त सर्व्हिस चार्ज रु. १०००/- घेतले जातील.
▪️ विहिरीतील गाळ काढून मिळेल. तसेच विहिरीत आडवे होल १० फुट ते २० फुट मारुन मिळेल. (१३) आम्ही खुदाई केलेल्या बोअरवेलला दुसऱ्याकडून पंपसेट फिटींग केल्यानंतर त्याची रिपेअर आणि पंपसेट अडकल्यास आमच्याकडून सव्र्हस मिळणार नाही. याची नोंद घ्यावी.
▪️आमच्याकडे कोणत्याही कंपनीचा पंपसेट, डोमेस्टीक पंप, ओपनवेल पंप. ४ (इंच) / ६” (इंच) सबमर्सिबल जुना पंपसेटदेऊन नवीन पंपसेट योग्य दरात २ वर्षे गॅरंटीसह नवीन पंपसेट घेऊन जा. (नियम व अटी लागू राहतील.)
💦
▪️आमचेकडून कॅमेराद्वारे अडकलेला पंपसेट किंवा बोअरवेलचा काही प्रॉब्लेम असेल तर किंवा बोअरवेलच्या पाण्याच्या
पातळीची संपूर्ण पहाणी करून मिळेल. ८०० फुटापर्यंत संपूर्ण बोअरवेल फक्त रु. ४०००/- पाहणी करून देऊ.
💦
▪️जुने बोअरवेल अडचणी ठिकाणी ३०० फुटापर्यंत लांब गाडी उभी करुन बोअरवेल साफ करुन मिळेल. तसेच हवे असल्यास जास्त खोली वाढवून मिळेल. तसेच अडकलेले पंपसेट योग्य दरात काढून मिळेल – 💦💦💧💦💦💧💦💦💧💦💦 💦✅आमचेकडे 3 वर्षे गॅरंटी सह होलसेल दरात कॉलमपाईप ( *बोअरवेल पंपासाठी योग्य*) व शेतीसाठी Pvc पाईप ऑर्डर प्रमाणे घरपोच मिळेल…
🔹 *1″ – 21kg- 1300 kg* *(कॅपासीटी) – 10 फुटी – 185/- परनग (500 फुटा पर्यंत )* 🌾🌾🌾🌾
🔸 *1,1/4″ – 21kg -1800 kg* *(कॅपासिटी) – 10 फुटी – 252/- पर नग*🌾🎋
🔹 *1½ – 21kg -1900kg* *(कॅपासिटी). 10 फुटी – 340/-* *पर – नग* 🌾🎋 -🔸 *2″ – 21kg – 3800kg कॅपासिटी- 10 फुटी – 540/- परनग*🎋🌾🌴
🔹 *2-1/2″ – 25kg- 4000 kg -(कॅपासिटी )-(800 फुट) – 610/- परनग*🌾🎋🌴
🔸 *3″ – 27kg -9900kg- (कँपासिटी)- 900 फुट – 1300/- पर नग*🌾🎋🌴
💧💧💧💧💧💧💧💧💧 *अधीक माहिती साठी आमच्याकडे संपर्क करावा.*

*श्रीराम बोअरवेल*
*🏨पत्ता*:- नवीन शिरोडा नाका, जीवनरक्षा हॉस्पीटल समोर, मळगाव रोड, सावंतवाडी – ४१६५१० ________________________ 📱7774851004
9420293799
7768898659
758857058
9422874647
______________________________
🌐🛜Email-shriramborewells99@gmail.com, Website: www.shriramborewells.com
_________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!