आणखीकोल्हापूरमहाराष्ट्रसामाजिक

🛑 कोल्हापूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसची आज झाली चाचणी..

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴कराड, दि -१४:- कोल्हापूर – पुणे वंदे भारत एक्सप्रेससंदर्भात एक मोठं अपडेट समोर आलंय. कोल्हापूर-पुणे वंदे भारत सोमवारपासून सुरू होणार आहे. दरम्यान, आठवड्यातून तीन वेळा धावणाऱ्या कोल्हापूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा सोमवारी शुभारंभ होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळी वंदे भारत एक्सप्रेची चाचणी घेण्यात आली. ठिकठिकाणी प्रवाशांनी ‘वंदे भारत’वर फुलांचा वर्षाव करीत स्वागत केले. कराड येथील रेल्वे स्टेशनवरून एक्स्प्रेस रवाना झाली.

कोल्हापूर – पुणे या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेसला नेमका किती वेळ लागतो ? या मार्गावर अन्य काही अडथळे आहेत का ? याची चाचणी घेण्यात आज घेण्यात आलीय. वंदे भारत आठवड्यातून तीन वेळा कोल्हापूर – पुणे या मार्गावर धावणार आहे. मागील आठवड्यात पुणे ते हुबळी वंदे भारतला कोल्हापूर थांबा प्रस्तावित झाला होता. त्यानंतर वाद वाढला होता.

सोमवारी रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमन्ना कोल्हापूर रेल्वे स्थानकावर या गाडीला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. कोल्हापूर – पुणे वंदे भारत दर सोमवार, गुरुवार आणि शनिवारी कोल्हापूर स्थानकातून सकाळी सव्वा आठ वाजता सुटेल आणि दुपारी दीड वाजता पुण्यात पोहोचेल. पुण्याहून दर बुधवार, शुक्रवार आणि रविवारी दुपारी सव्वा दोन वाजता ही गाडी सुटेल आणि सायंकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी ती कोल्हापुर स्थानकात दाखल होईल.

वंदे भारत एक्सप्रेस तिकीट किती?

 

ही एक्सप्रेस मिरज, सांगली, किर्लोस्करवाडी, कराड आणि सातारा या स्थानकावर थांबणार आहे. कोल्हापूर पुणे या प्रवासाचे दर चेअर कारसाठी १ हजार १६० रुपये आकारण्यात येईल, तर एक्झिक्यूटिव्हसाठी २ हजार ५ रुपये आकारण्यात येणार आहेत. वंदे भारत कोल्हापूर ते पुणे मार्गावर १६ सप्टेंबरपासून धावणार आहे. प्रदीर्घ संघर्षानंतर कोल्हापूरकरांसाठी गुडन्यूज आहे. त्यांची वंदे भारतची मागणी पूर्ण झालीय. दोन दिवसानंतर वंदे भारत आता प्रवाशांच्या सेवेत येणार आहे.

 

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!