कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

चौकुळ गावचा एकोपा पुन्हा एकदा अधोरेखित.गाव करेल ते राव काय करणार हे दिले दाखवून

*🛑 चौकुळ गावचा एकोपा पुन्हा एकदा अधोरेखित.गाव करेल ते राव काय करणार हे दिले दाखवून*

*🛑 पुर्वीची कृती समिती केली गावाने बरखास्त,६५जणांचे नेमले गाव व्यवस्थापन मंडळ*

*🛑गावच्या वतीने निर्णय घेण्याचा दिला व्यवस्थापन मंडळाला अधिकार*

*🛑गावच्या कारभारात राजकारण न आणता,गावचा एकोपा गावाने टीकवला*

*🛑शिक्षण मंत्री दिपक केसरकरच गावचा प्रश्न सोडवू शकतात व्यक्त केला विश्वास*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ संपादकीय – सीताराम गावडे*

*🎴सावंतवाडी , दि-१२:-* सह्याद्री पट्ट्यातील सैनिकांचे गाव म्हणून नाव लौकीक लाभलेल्या व पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला चौकुळ गाव, गावच्या एकी साठी ही तेवढाच प्रसिद्ध आहे, चौकुळ गावांमध्ये कोणतीही ,कसलीही , घटना घडली तर गावच्या सातेरी देवीच्या मंदिरात बैठक लावून पहिल्यांदा गाव बैठकीत निर्णय घेतला जातो व गाव बैठकीतच त्याचा निवड होतो, ही आजपर्यंत चालत आलेली प्रथा आहे. त्यामुळे चौकुळ गाव हे तंटामुक्त गाव म्हणूनही ओळखले जातो, या गावच्या प्रमुख मानकऱ्यांनी सातेरी देवीच्या देवळाच्या सभागृहात घेतलेला निर्णय हा अंतिम मानला जातो, त्या निर्णयावर कोठेही भाष्य केले जात नाही.
चौकुळ गाव जेवा महाराष्ट्र शासन म्हणून लागला तेव्हापासून चौकुळ गावाने एकोप्याने लढा दिला त्यासाठी कृती समिती स्थापन केली व त्या समितीला सर्वाधिकार दिले, कृती समितीने आपल्या परीने लढा दिला मात्र त्यात ते यशस्वी झाले नाहीत ,हे भिजत घोंगडे पडले असताना आंबोली गेळे कबुलायतदार प्रश्न सुटण्याची चिन्हे निर्माण झाली व याच वेळी चौकुळ गावाने ही आपली महाराष्ट्र शासन म्हणून असलेली नोंद रद्द होऊन तो सातबारा गावच्या नावे पुन्हा व्हावा यासाठी दिनेश गावडे यांच्या नेतृत्वाखाली उपोषण छेडले गेले, गावाने एक मुखाने या उपोषणाला पाठिंबा दिला व त्यावेळी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना सोबत घेऊन त्या उपोषणाला भेट देऊन लवकरच आपला प्रश्न निकाली काढू असे आश्वासन दिले,त्यानंतर गावाने 65 जणांची कमिटी करून ती कमिटी अधिकारी व मंत्र्यांशी चर्चा करेल असे ठरविले ,मात्र या कमिटीवरून गावात दोन गट पडले पूर्वीच्या कृती समितीने आम्हाला हा निर्णय मान्य नाही असे सांगून शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्यावर टीका केली, मात्र गावाने आम्ही एकमुखाने निर्णय घेतला आहे त्यामुळे गावच करेल ते खरे असे सांगून गावापुढे रावा चे काय चालत नाही हे दाखवून दिले आहे.
‌. पुर्वीच्या कृती समितीने शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या वर टीका करुन गावाचा बहिष्कार असे जाहिर केल्यावर चौकुळ गावाच्या सातेरी सभामंडपात सभा बोलवण्यात आली या सभेला गावातील सुमारे एक हजार नागरिक उपस्थित होते या बैठकीला पुर्वीच्या कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनाही बोलावले होते मात्र त्या बैठकीला ते उपस्थित राहिले नाहीत, म्हणून गावाने कृती समिती गावाचा प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरली असे ठरवून ती समिती बरखास्त केली,व गावाने जी 65 जणांचे गाव व्यवस्थापन मंडळ स्थापन केले त्यालाच सर्वाधिकार आहेत, तेच गावाच्या वतीने निर्णय घेतील, तेच गावाच्या वतीने अधिकृत पत्रकार परिषद घेतील, गावाच्या जमिनीबाबत न्याय निवडा करण्याचा अधिकार त्याच 65 जणांच्या समितीला आहे ,व यापुढे गावाच्या वतीने फक्त ही समितीच अधिकृतपणे बोलेल असे ठरविण्यात आले, त्यामुळे गावात दुफळी माजवणाऱ्या काही जणांना ही गावाने चपराक दिली आहे. या ही पुढे होऊन शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर हेच चौकुळ गावचा प्रश्न सोडवतील असा विश्वास तेथील ग्रामस्थांनी व्यक्त करून लवकरात लवकर हा प्रश्न सुटावा अशी अपेक्षा व्यक्त केली. शिक्षण मंत्री केसरकर दिपक केसरकर यांनीही याबाबत महसूल मंत्री यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न आचारसंहितेपूर्वी चौकुळ, निकाली निघेल असा विश्वास व्यक्त केला आहे.यानिमित्ताने पुन्हा एकदा एक गोष्ट अधोरेखित झाली की चौकुळ गावात कोणीही ,कशीही ,लुडबुड करू शकत नाही, तेथील मानकरी देवळात बसून जो निर्णय घेतात तोच अंतिम असतो ,तोच गावाला स्वीकारावा लागतो व त्या निर्णयावर गाव शंभर टक्के सहमत असतो म्हणूनच कालच्या बैठकीला हजारोंची उपस्थिती असताना सुद्धा कोणीही गावकरी एक चकार शब्द बोलला नाही सर्व गावकऱ्यांनी एकमताने गावाने निवडलेल्या गाव व्यवस्थापन मंडळाला अनुमोदन देऊन गावातील एकोपा पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!