लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू करा !
*🛑लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू करा !*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि-१२:-* राज्य शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केल्यानंतर या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. योजनेमुळे महिलांच्या बँक खात्यात जुलै, ऑगस्टचे एकत्रित ३००० रु. जमा झाले होते. १९ ऑगस्टला पहिला हप्ता जमा झाला होता. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. सुरुवातीला सरकारने अॅप आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली होती. पण ज्यांना अजून अर्ज भरता आलेले नाहीत. त्यांच्यासाठी निराशाजनक वृत्त आहे. कारण शासनाने आता लाडकी बहीण योजनेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने घेण्यास बंद केले आहे. (mukhyamantri majhi ladki bahin yojana online application is closed) ऑनलाईन रजिस्ट्रेशन बंद
या योजनेसाठी अर्ज करण्यास आधी शेवटची तारीख ३१ ऑगस्ट होती. नंतर ती वाढविण्यात आली आहे. ‘नारी शक्तिदूत’ या अॅपमधून योजनेसाठी आधी अर्ज करता येत होते. नंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज
घेतले जात होते. पण आता ते बंद झाले आहेत. त्यामुळे महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे. सुरुवातीला अॅपद्वारे अर्ज भरतानाही तांत्रिक अडचणी येत होत्या. नंतर शासनाने www.ladkibahin. maharashtra.gov.in ही नवीन वेबसाईट. सुरू केली. नारीशक्ती दूत अॅपमध्ये फॉर्म भरताना ‘NO NEW FORM ACCEPTED’ असा मेसेज येत आहे. ऑनलाईन अर्ज भरताना अंगणवाडीसेविका यांना संपर्क करण्याचा मेसेज येत आहे. महिलांमध्ये काहीशी नाराजी योजना सुरू झाल्यानंतर लाखो महिलांनी अर्ज केले. सुरुवातीला अनेकांना अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी बराच वेळ लागत होता. ऑनलाईन पद्धतीने आणि नारी शक्ती दूत अॅपद्वारे अर्ज घेणे सुरू केल्याने त्याचा फायदा अनेक महिलांना घेता आला पण आता दोन्ही पद्धतीने अर्ज बंद झाल्याने महिलांमध्ये नाराजी आहे. शासनाने www.ladkibahin.maharashtra. gov.in या वेबसाईटच्या माध्यमातून पुन्हा अर्ज घ्यावे, अशी मागणी महिला करत आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

