🛑 मुंबईची लाईफलाईन पुन्हा कोलमडली, हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴मुंबई , दि – १०:- मुंबईत सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरु आहे. पण मुंबईकरांच्या मागे लागलेले विघ्न काही संपता संपत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असलेली मुंबई लोकल आज पुन्हा एक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे कामावर निघालेल्या चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसत आहेत. सध्या मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गावरील वाहतूक सेवा कोलमडली आहे. तसेच मध्य रेल्वेच्या मुंबई उपनगरीय लोकल सेवेतील हार्बर मार्गावरील वाहतूक ही पूर्णपणे ठप्प झाली आहे.
हार्बर रेल्वे वाहतूक सेवा कोलमडली
मध्य रेल्वेच्या मुंबई उपनगरीय लोकल सेवेच्या हार्बर मार्गावरील वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. नेरुळ रेल्वे स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने ही लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे हार्बर रेल्वे वाहतूक सेवा कोलमडली आहे. यामुळे चाकरमान्यांचे हाल होताना दिसत आहे. तसेच प्रवाशांचीही मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे.
नेरुळ स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटली
मिळालेल्या माहितीनुसार, हार्बर रेल्वे मार्गावरील नेरुळ स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटली आहे. याचाच परिणाम सध्या लोकल सेवेवर पाहायला मिळत आहे. यामुळे पनवेल ते वाशी स्थानकादरम्यानची लोकलसेवा अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आली आहे. गेल्या तासाभरापासून या मार्गावरुन एकही लोकल धावलेली नाही. सध्या नेरुळसह पनवेल भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे हा तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी अधिक वेळ लागणार आहे. सध्या हार्बर रेल्वेवरील अनेक रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे.
अनेक प्रवाशांचा जीव मुठीत घेऊन प्रवास
सध्या हार्बर मार्गावरील पनवेल ते सीएसटीएम ही वाहतूक सध्या उशिराने सुरु आहे. तर पनवेल ते ठाणे या दिशेने जाणारी वाहतूक ही पूर्णपणे ठप्प आहे. त्यामुळे अनेक प्रवाशी हे जीव मुठीत घेऊन रेल्वे ट्रॅकवरुन चालत प्रवास करत आहेत.
मध्य आणि पश्चिम रेल्वेही उशिराने
तर दुसरीकडे आज मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत झाली आहे. कल्याणवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जाणाऱ्या गाड्या 10 ते 12 मिनिट उशिराने सुरु आहेत. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. तांत्रिक बिघाड आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांमुळे मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे. यामुळे सलग दुसऱ्या दिवशी कामाला जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होताना दिसत आहे. मध्य रेल्वेसह पश्चिम रेल्वेवरील वाहतूकही सध्या उशिराने धावत आहे.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

