अखेर संतापलेल्या ग्रामस्थांनी मळगाव ग्रामपंचायत कार्यालयाला ठोकले “टाळे”
*अखेर संतापलेल्या ग्रामस्थांनी मळगाव ग्रामपंचायत कार्यालयाला ठोकले “टाळे”*
*ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराविरोधात ग्रामस्थांचा उद्रेक*
*सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले, माजी आमदार राजन तेली यांनी घटनास्थळी ग्रामस्थांची भेट घेऊन जाणून घेतल्या समस्या…*
मळगाव :-
गावातील स्ट्रीट लाईट हा कळीचा मुद्दा ठरल्यानंतर ग्रामस्थांकडून दिलेली डेडलाईन ग्रामपंचायतकडून पाळली न गेल्याने आज ठरल्याप्रमाणे मळगाव ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर एकञ येत सकाळी ग्रामपंचायत कार्यालयाला अखेर टाळे लावत ग्रामपंचायत बंद करण्यात आली,
यावेळी मोठ्या संख्येने गावातील ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते एकञ आले होते…
गेले सहा महिने गावातील स्ट्रीट लाईट बंद असल्याने संपूर्ण गाव ऐन सणासुदीला अंधारात पाहायला मिळत होता, याबाबत ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी होती, वेळोवेळी तक्रारी करून कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नव्हती, गावातील सरपंच,सदस्य तक्रारी करूनही दुर्लक्ष करत होते, याचा ग्रामस्थांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता, त्या रोषाचा आज उद्रेक होऊन ग्रामस्थांनी आज एकञ येत ग्रामपंचायत कार्यालयाला ठाळे ठोकून ग्रामपंचायत कारभाराचा निषेध केला…
ग्रामस्थांच्या रोषाचा सरपंचाना एकट्याने सामना करावा लागला,यावेळी इतर ग्रामपंचायत सदस्य अनुपस्थितीत राहील्याने लोकांनी सरपंचाना धारेवर धरले…
गावातील रस्तांची असलेली समस्या, गटारव्यवस्था, लाईटची व्यवस्था, पाणीपुरवठा याबाबत ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला वेळोवेळी कळवूनही कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नव्हती, ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढला आहे, कर्मचाऱ्यांचे पगार मनमानीपणे वाढवण्यात आले, गावातील लोकांकडून दिवाबत्ती कर, पाणी कर,घरपट्टी आदी प्रकारचे कर ग्रामपंचायत कडून वसूल करण्यात येतात, माञ कोणत्याही सोयीसुविधा, प्राथमिक सुविधा दिल्या जात नाही,
यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर समस्यांचा पाढा वाचला, यावेळी ग्रामपंचायत कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली,
ऐन गणेशोत्सव काळात ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकण्याची वेळ आल्याने याप्रकारची जोरदार चर्चा तालुक्यात पाहायला मिळाली..
दरम्यान या प्रकारची माहिती मिळताच सावंतवाडी संस्थान चे युवराज लखमराजे भोसले, माजी आमदार राजन तेली यांनी घटनास्थळी ग्रामस्थांची भेट घेऊन गावातील समस्या जाणून घेतल्या…
याबाबत समन्वयाने व शांतपणे आपण प्रश्न सोडवू, असे सरपंचांनी सांगितले.
यावेळी मळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग राऊळ, बाप्पा नाटेकर, ॲड. निधी दाभोळकर, महेंद्र पेडणेकर, गुरुनाथ गावकर, विलास मळगावकर, गुरुनाथ नार्वेकर, सिद्धेश तेंडोलकर, विश्वनाथ गोसावी, बाळा बुगडे, निलेश राऊळ, प्रेमनाथ राऊळ, लाडू जाधव , नितेश तेली, संजय जाधव, महेश शिरोडकर, मयूर गावकर, ज्ञानेश्वर राऊळ, लाडकोबा गावकर ,उल्हास मांजरेकर, राजेश राऊत , राकेश राऊळ , ज्ञानेश्वर मळगावकर, दिलीप कानसे, शंकर राऊळ, दीपक मळगावकर, महेश राऊळ, सोना गावकर, राजू नाईक, दिनेश नाईक, पांडुरंग नाटेकर, राजाराम शिरोडकर, सुधाकर तेली, अमोल सावळ, प्रितेश दाभोळकर, सुधाकर नाईक, प्रणव सावळ, कांता सावळ, जयेंद्र जाधव, जयराम राऊळ, विलास जाधव, दीपक जाधव, समीर हरमलकर यांसह शेकडो ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते…

