*समृध्दी ऑरगॅनिक फर्म प्रा. लि. पुणे यांच्या मार्फत गुहागर तालुक्यातील पाभरे, कुटगिरी व कोंधर या तीन गावातील शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय शेतीचे मार्गदर्शन*
*गुहागर-*
समृध्दी ऑरगॅनिक फर्म प्रा. लि. पुणे मार्फत एम डी प्रशांत मोरणकर मॅनेजर सचीन मिसारे,, धीरज पाटील l यांच्या मार्गर्शनाखाली गुहागर तालुक्यातील पाभरे, कुटगिरी व कोंधर या तीन गावातील शेतकऱ्याचे एकत्रित कुटगिर गावात दिनांक 27 ऑगस्ट 2024 व 30 ऑगस्ट 2024 रोजी सेंद्रिय शेती प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी तीनही गावातली शेतकऱ्यांनी प्रशिक्षणात सक्रिय सहभाग घेतला.
यावेळी एक एफ ओ ओंकार सापळे व सेलव्हिस्टर डिसोझा यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सेंद्रिय पद्धतीने शेती कशी केली जाते व त्याच्ये फायदे यावेळी पटवून देण्यात आले. तसेच कंपोस्ट खत तयार करण्यासाठी एफको बायो डी कंम्पोजर कल्चर चे वाटप करण्यात आले. प्रशिक्षणात गावातली शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. त्याच्या शेती विषयक समस्यांचे निराकरण कऱण्यात आले. पाभरे गावातील 24 शेतकरी , कोंधर कालसुर मधील 27 व कुटगिरी मधील 30 असे एकूण 81 शेतकरी समृध्दी ऑरगॅनिक फर्म मार्फत सेंद्रीय शेतीशी जोडले गेले आहेत.

