कोकणदेवगडमहाराष्ट्र

नाडण पुजारेवाडीतील युवकाची आत्महत्या

*🛑नाडण पुजारेवाडीतील युवकाची आत्महत्या*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴देवगड, दि-०५:-* तालुक्यातील नाडण वरची पुजारेवाडी येथील पराग गणेश पुजारे (२२) याने आपल्या राहत्या घरातील स्वयंपाकघरावरील माळ्याच्या खोलीत नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी साडेसात वा. च्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकलेले नाही. या घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू अशी करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पराग हा आई- वडील, बहिणीसोबत सामाईक घरात राहत होता. बहीण आजारी असल्याने उपचारासाठी ती आईसमवेत मुंबईला गेली होती. त्यामुळे पराग व त्याचे वडील हे दोघेच घरात होते. पराग हा मंगळवारी रात्री ८ वा. च्या आपल्या काकांकडे जेवणासाठी गेला. तेथून तो रात्री १० वा. च्या सुमारास आपल्या घरात झोपण्यासाठी गेला. झोपण्यापूर्वी त्याने आपल्या आईला कॉल करून तिच्याशी संवाद साधला. त्यानंतर तो झोपण्यासाठी घरातील स्वयंपाकघरावरील माळ्याच्या खोलीत गेला. बुधवारी सकाळी नियमित वेळेत खोलीतून खाली न आल्याने त्याचे वडील त्याला पराग पुजारे घटनेची माहिती मिळताच पाहण्यासाठी माळ्याच्या खोलीकडे गेले. यावेळी त्यांना पराग हा नायलॉन दोरीने गळफास लावलेल्या स्थितीत दिसून आला. या देवगडचे पोलीस हवालदार महाडिकं व आशिष कदम घटनास्थळी जात पंचनामा महेंद्र यांनी केला. देवगड ग्रामीण रुग्णालयात विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. घटनेची खबर परागचे काका महेश मधुकर पुजारे यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली. या घटनेचा तपास पोलीस हवालदार आशिष कदम करीत आहेत.

*आईशी चतुर्थीच्या तयारीबाबत संवाद, पण…*

पराग हा वेल्डिंगचे काम करायचा. त्याचे शिक्षण बारावीपर्यंत झाले होते. त्याने जीवन संपविण्यापूर्वी आईशी फोनद्वारे संवाद साधला होता. यावेळी त्याने आईशी गणेशोत्सवाच्या तयारीबाबत, कामांबाबतही चर्चा केली होती. आईसोबतच्या एका कॉलनंतर तो झोपण्यास गेला. मात्र, त्याची आई त्याला पुन्हा कॉल करत होती. परंतु, त्याने ते कॉल रिसिव्ह केले नाहीत. अन् दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!